कोपरगाव :अवैध व्यवसाय व पूर्व वैमनस्यातून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या गोळीबारप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आठ जणांना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. या आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, दोन्ही गटांनी परस्पर फिर्यादी दाखल केल्या आहेत.
रामनाथ (दादा) मोरे, अमर बाळू भोसले, बन्सी (रवी) बनसोडे, बाळासाहेब शिवाजी पगारे, नाजीम शेख, अजहर शेख, एजाज मणियार, सागर मंजुळे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता, २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी शिरीष वमने म्हणाले की, पूर्व वैमनस्यातून १९ सप्टेंबरला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास दोन गटांत गोळीबाराची घटना घडली. घटनेतील आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, आठ जणांना अटक केली आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न व शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्ण्यात आला आहे.
नाजीम शेख याने फिर्याद दाखल केली. फिर्यादीत म्हटले आहे की, १९ सप्टेंबर रोजी शहरातील स्वामी समर्थ रस्त्यावरून कारमधून (एमएच ०४ जीझेड- ५७५८) गोदावरी नदी छोट्या पुलाकडे जाता असताना आरोपी तनवीर रंगरेज (रा. सुभाषनगर), दादा मोरे (रा. राहाता), रवी बनसोडे (रा. शिर्डी), अमर भोसले (रा. लोणी), बाळू पगारे (रा. शिंगवे, राहाता), शाहरुख शेख (रा. श्रीरामपूर) यांनी त्यांची कार आमच्या कारला आडवी लावून दादा मोरे याने गावठी विस्तुलातून आमच्या दिशेने गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दुसरी फिर्याद रामनाथ ऊर्फ दादा गोरख मोरे याने दाखल केली असून, त्यात म्हणाले की, गोदावरी नदी पुलाकडे जात असताना नाझीम शेख, एजाज मनियार, सागर मंजूळ, अजहर शेख (रा. कोपरगाव) यांनी त्यांचे वाहन आमच्या कारला आडवे लावून शिवीगाळ करून जीवे ठार करण्याची धमकी दिली. नाझीम शेख याने गावठी विस्तुलातून गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.