अकोले - भंडारदरा-मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटघर येथे आठ इंच पाऊस झाला असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून, भातखाचरांत पाणी साचल्याने गाळ तुडविण्याचे काम सुरू आहे. रोपांची चांगली वाढ झाल्याने लवकरच रोपलावणी सुरू होईल.
घाटघर, रतनवाडी, साम्रद, शिंगणवडी, कोलटेंभे, लव्हाळी वाडी, पांजरे, उडदावणे परिसरात धुके व पाऊस असल्याने गारठा वाढला आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी आपली जनावरे घरातच बांधून शेकोटी पेटवली आहे. त्यामुळे आदिवासी भाग गारठला आहे. भंडारदरा जलाशयात पाण्याची आवक वाढत असून, आज सकाळी जलाशयात ३३५ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. मुळा नदीतून २८२९ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. भंडारदरा जलाशयात ३६०८ दशलक्ष घनफूट साठा होता.
सायंकाळी सहा वाजता ३७४४ दशलक्ष घनफूट साठा झाला. निळवंडेत ३६०२ दशलक्ष घनफूट साठा होता. काल सर्वाधिक घाटघर येथे १९१ मिलिमीटर म्हणजे पाऊण आठ इंच पाऊस झाला.
पावसाची आकडेवारी अशी ः भंडारदरा १०९ मिलिमीटर (६३७), घाटघर १९१ (११४७), रतनवाडी १६४ (११३४), वाकी ८७ (४५०), निळवंडे ११(३२८), आढळा ४ (७५), अकोले ९ (२००) मिलिमीटर पाऊस झाला आहे.
एकत्रित आवणी
इर्जिकसाठी शुक्रवारी मुतखेल गावातील जयराम इडे या शेतकऱ्याकडे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आवणी केली. महिलांनी बोली भाषेत गाणी गायिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.