Electoral Roll : मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; अंतिम यादी २० ऑगस्टला होणार प्रसिद्ध

Assembly Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाचे पत्र राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाले आहे.
Electoral Roll
Electoral Roll Sakal
Updated on

Ahmednagar News : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुका संपताच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १ जुलै २०२४ या अर्हता तारखेनुसार मतदार याद्या केल्या जाणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पत्र राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाले आहे. आयोगाच्या सूचनेनुसार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होणार असून, आलेल्या पत्रानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ पूर्ण होत आहे. त्याअगोदर राज्यात निवडणुका घेऊन सरकार स्थापन होण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली. मतदार यादी कार्यक्रमाचे वेळापत्रक पाठवले असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Electoral Roll
Childcare Scheme : एकल पालकांच्या मुलांना आता दरमहा 2000 रुपये; बालसंगोपन योजनेतून करा अर्ज

मागील पंचवार्षिकला विधानसभा निवडणूक २१ ऑक्टोबरला होऊन त्यानंतर २४ ऑक्टोबरला २०१९ मतमोजणी झाली होती. त्याच दरम्यान यावेळेचीही निवडणूक गृहीत धरल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागू शकेल.

त्यामुळे आचारसंहिता लागू व्हायला, अवघा दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. सध्या राज्यात आमदारांतून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

Electoral Roll
Ahmednagar : ‘सेतू’ केंद्रचालकांची वाढली मनमानी; दाखल्यांसाठी आर्थिक पिळवणूक; सर्वसामान्यांची लूट, प्रशासनाचे दुर्लक्ष

त्याचा निकाल लागताच विधानसभेच्या निवडणुकीला वेग येणार आहे. त्याचबरोबरीने निवडणूक आयोगाची प्रक्रियाही गतिमान होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मतदार यादी अद्यावतीकरण कार्यक्रमाचे पत्र जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झालेले आहे.

मतदार याद्यांचा कार्यक्रम असा

  • केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (ब्लॉक लेव्हल ऑफिसर) मतदान नोंदणीसाठी घरोघरी सर्वेक्षण : २५ जून ते २४ जुलै २०२४

  • प्राथमिक मतदार यादी प्रसिद्धी : २५ जुलै २०२४

  • मतदार यादीवरील हरकती : २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४

  • हरकतींचे निराकरण करण्यासाठी विशेष मोहीम : शनिवार, रविवार

  • हरकतींवरील निकाल : १९ ऑगस्ट २०२४

  • अंतिम मतदारयादी प्रसिद्ध : २० ऑगस्ट २०२४

लोकसभा निवडणुकीत सोयीच्या ठिकाणी मतदान केंद्रे उपलब्ध करून दिल्याने मतदानाचा टक्का वाढला. विधानसभा निवडणुकीतही मतदान केंद्रांसाठी व्यापक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शाळा, सामुदायिक सभागृहे, गृहनिर्माण सोसायटीतील सुरक्षित खोल्या यांचा शोध घ्यावा, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत.

- राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा, अहमदनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com