अहमदनगर - दहावी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावरच आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते. पुढील आयुष्याचं यश-अपयश, स्ट्रगल, व्यक्तीचे समाजातील स्थान हे पुढील प्रवेशावर अवलंबून असते. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे, त्यामुळे पालकांच्या अकरावी प्रवेशाबाबत अनेक प्रश्न आहेत. यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘सकाळ’ने टाकलेला प्रकाश.
यंदा अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेशासाठी हा आहे गुणांच्या टक्केवारीचा निकष?
कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेताना गुणांची टक्केवारी हा महत्त्वाचा भाग असतो. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया कशी होणार आहे, हे स्पष्ट होते. अनुदानित तुकड्यांसाठी गुणांची टक्केवारी ठरवून दिली आहे. त्यानुसार अकरावी प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गाला ७२ टक्के, ओबीसी, एनटी- ७० टक्के, एससी- ६८ टक्के, एसटी-६५ टक्के अशी गुणांची टक्केवारी आहे. त्यानुसार अनुदानित तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहेत.
विचारपूर्वक निर्णय घ्यावा... मुलांच्या आवडीला हवे प्राधान्य!
कोणते महाविद्यालय निवडावे?
कॉलेजबाबत पालकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना रेग्युलर तर काहींना कधीतरी येण्यासाठी कॉलेज पाहिजे असते. मात्र, जे महाविद्यालय मुलांना उत्तम फॅकल्टी देते, मुलांच्या शंकाचे निरसन करते, असे कॉलेज कधीही चांगले आहे.
उत्तम करिअरसाठी कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा?
अनेक पालक व मुलांना प्रश्न पडतो की, कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा? यासाठी शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये मुले व पालकांचे कॉन्सिलंग करण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आली आहे. तेथे गेल्यावर मुलाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे जाणून घेतले जाते. त्यानुसार त्याला मार्गदर्शन करुन कोणत्या शाखेकडे त्याचा कल आहे, हे जाणून घेतले जाते. त्यानुसार दहावीच्या मार्कावर प्रवेश दिला जातो.
गुणांच्या आधारे शाखा निवडीसाठी फायदा होतो का?
काही विद्यार्थ्यांचे आपल्याला कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा हे अगोदरच ठरलेले असते. त्यानुसार ते विषयांची निवड करतात. मात्र, काही पालक असेही असतात की, त्यांच्या मुलांना कमी मार्क्स पडलेले असताना जेईई, नीट सारखी तयारी मुलांकडून करण्याचा घाट घालतात. त्यांनी तसे न करता मुलांची आवड जाणून घेतली पाहीजे. नाहीतर भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात.
प्रवेश प्रक्रिया किती दिवस चालेल?
अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही जूनअखेरपर्यंत सुरु राहाणार आहे.
अकरावी करताना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी?
जेईई, नीट आणि सीईटीची तयारी करण्यासाठी अकरावीपासून एकच कॉलेज निवडणे कधीही उत्तम. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विषयांची निवड अचूक करायला हवी. नीटची तयारी करण्यासाठी पीसीबी किंवा पीसीएमबी असे विषय घ्यावेत. तर जेईईची तयारी करण्यासाठी पीसीएम घ्यावे. सोबतच रेग्युलर कॉलेजमध्ये जावून सीईटीची तयार करता येवू शकते.
आर्टमध्ये करिअरच्या काय संधी आहेत?
आर्टमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. नाट्यशास्त्र, संगीत, विज्ञानसह युपीएससी, एमपीएससीची तयारी करणे सोपे जाते. यासह इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासनशास्त्र भूगोल, असे विषय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतात.
कॉमर्सला प्रवेश घ्यावा का?
वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यास करिअरच्या अनेक संधी आहेत. बॅंकीग, फायनान्समध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. सीए, सीएसमध्ये करियर करता येते.
जेईईसाठी कोणकोणते विषय निवडावेत
भविष्यात इंजिनियरिंगला जायचे असल्यास जेईई ची तयारी करण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे विषय निवडावेत.
नीट साठी कोणते विषय घ्यावेत
नीटसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्यात बायोलॉजीला किमान ७० टक्क्याहून अधिक गुण असावेत.
मुलांची क्षमता पालकांना माहिती असते. त्यानुसार क्षेत्र निवडावे. प्रतिष्ठेसाठी किंवा कोणीतरी सांगितले म्हणून एखाद्या शाखेला प्रवेश घेणे उचित ठरणार नाही. मुलांच्या क्षमतेपेक्षा अधिक ताण देणे योग्य नाही. त्यापेक्षा त्याच्या आवडीच्या क्षेत्राकडे जाऊ द्या. त्यासाठी पालकांनीही प्रोत्साहन द्यावे.
- संजय कळमकर, शिक्षणतज्ज्ञ
अकरावीला प्रवेश घेताना गोंधळून जाऊ नका. विद्यार्थ्याची आवड कशात आहे, हे आता ठरविण्याची वेळ आहे. मुलांना भविष्यात काय व्हायचेय, त्या क्षेत्रात आगामी पाच वर्षांनंतर काय संधी असतील, याचा विचार करा. मुलांशी चर्चा करा.
- शंकर थोपटे, प्राचार्य, राधाबाई काळे महिला महाविद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.