Ahmednagar Politics: राजकारणात कोणत्या वेळेला कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही. तुम्हाला सत्तेत राहण्याची आणि मंत्रिपदाची संधी फक्त भाजपच देऊ शकते, असे म्हणत माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.
बोल्हेगावमधील राजे छत्रपती संभाजीनगर येथील स्व. विशालभाऊ वाकळे पाटील उद्यानात माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, निखिल वारे, मनोज कोतकर आदी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, की कोणाला कोणत्या पक्षात जावे लागेल याची खात्री नाही. त्यामुळे येथून पुढे पक्षाचा उल्लेख करू नका. तुमचा पक्ष तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करू शकतो. महापालिकेत भाजपचे केवळ १४ नगरसेवक निवडून आले, तरी महापौर आणि उपमहापौर भाजपचे झाले. पुढे आम्ही राष्ट्रवादीला मदत करत त्यांची सावड फेडली. आजच्या तरुण राजकारण्यांनी राजकारणापलिकडे जाऊन कामे केली पाहिजेत.
काही जण दोरीत वागतात, त्याचा तोटाच होतो. सर्वांशी चांगले संबंध असल्यामुळे मी कधी आमदार झालो ते कळलंच नाही. कुमार वाकळे यांनी महापालिकेत चांगले काम केले. भाजपमुळे त्यांना सभापतिपदाची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. अमृत योजनेसारखी कामे मार्गी लागली. या योजनेमुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. बोल्हेगावसारख्या ठिकाणी चालण्यासाठी साधे रस्ते नव्हते, तेथे कुमार वाकळे यांनी चांगले काम करून दाखविले. त्यांच्यामुळे बोल्हेगावचा चेहरा- मोहरा बदलला असल्याचे त्यांनी सांगितले.
पैसे खर्च करू नका
विकासकामातून लोकांचे प्रेम आणि विश्वास कसा जिंकता येतो, हे कुमार वाकळे यांनी दाखवून दिले. त्यांनी वाढदिवसाला मोठा खर्च केला. परंतु आता जास्त पैसे खर्च करू नका, खर्चाला फाटा द्या. आमच्या आमदारकीसाठी पैसा शिल्लक ठेवा, मग आम्ही देखील तुम्हाला महापालिका निवडणुकीत मदत करू, असा टोला शिवाजीराव कर्डिले यांनी लगावला.
मनपा निवडणुकीचा विचार करू नका
नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत महापालिका निवडणुकीचा विचार करू नका. आमच्या आमदारकीच्या निवडणुकीकडे लक्ष द्या, मगच आम्ही तुम्हाला मदत करू, असे साकडे कर्डिले यांनी उपस्थित नगरसेवकांना साकडे घातले.
मंदिरांमुळे लोक एकत्र
बोल्हेगाव परिसरात मोठे दत्त मंदिर उभे राहिले आहे. मंदिरांमुळे लोक एकत्र येतात. प्रत्येक भागात अशी मंदिरे उभारणे गरजेचे आहे. बोल्हेगाव- नागापूर भागात मोठी विकासकामे सुरू आहेत. यापूर्वी या भागात कोणी वास्तव्यास तयार नव्हते. परंतु आता या भागात पाणी प्रश्नासह इतर समस्या कुमार वाकळे यांनी दूर केल्या असल्याचे शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.