चौंडीत आढळला ऐतिहासिक घाट, अहिल्याबाईंनी काशीहून आणले दगड

चौंडीत आढळला ऐतिहासिक घाट
चौंडीत आढळला ऐतिहासिक घाटई सकाळ
Updated on

जामखेड : आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने मागील आठवडाभरापासून चौंडी येथे सीना नदीपात्राच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. अडीचशे वर्षांपूर्वी नदीपात्रालगत अहिल्यादेवींनी बांधलेला व मातीखाली बुजलेला जुना घाट काम सुरू असताना सापडला आहे.

या घाटाच्या पायऱ्यांची आमदार पवारांनी स्वच्छता करून पूजा केली. आमदार पवारांनी तालुक्‍यातील 21 गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. यात चौंडीचाही समावेश आहे. येथील सीना नदीपात्राच्या खोलीकरणाच्या कामास आमदार पवार यांच्या मातुःश्री सुनंदा पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला होता. या कामास पवार यांचे वडील राजेंद्र यांनीही भेट दिली होती. (Excavation of the historic ghat at Choundi)

चौंडीत आढळला ऐतिहासिक घाट
पवारांची लेक सायकल चालवते नेक! बाबांकडे धरला होता हट्ट

नदीपात्राचे खोलीकरण करताना निघालेला गाळ शेतीला उपयुक्त ठरत असल्याने, परिसरातील शेतकऱ्यांनी गाळ उचलण्यास प्रतिसाद दिला. नदीपात्र खोलीकरणादरम्यान मातीखाली बुजलेल्या पायऱ्या आढळून आल्या. जसजसे खोदकाम करण्यात आले, तसतसा अनेक वर्षांपासून मातीखाली दबलेला घाट वर आला.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी (ता. जामखेड) येथील जन्मस्थळाला आमदार पवार यांनी जयंतीनिमित्त भेट दिली. येथील अहिल्यादेवींचा वाडा, अहिल्येश्‍वर मंदिर, चौंडेश्‍वरी मंदिर, नक्षत्र उद्यान, महादेव मंदिर परिसरातील सीना नदीपात्राच्या दिशेने बांधलेल्या घाटाला भेट दिली. अडीचशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवींनी हा घाट बांधला होता. मात्र, नदीपात्र उथळ होत गेल्याने घाट मातीखाली बुजला होता. तो वर आल्याने, त्याची स्वच्छता करून आमदार पवार यांनी पूजा केली.

मंदिर आणि घाटासाठी एकच दगड

विशेष म्हणजे, या घाटासाठी वापरलेला दगड व येथील अहिल्येश्‍वराच्या मंदिरासाठी वापरलेला दगड एकच आहे. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवींनी हा दगड काशी येथून आणून मंदिर व घाट बांधल्याचे सांगण्यात येत आहे. (Excavation of the historic ghat at Choundi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()