- राजू नरवडे
संगमनेर : प्राण्यांवर प्रेम व्यक्त करणाऱ्यांच्या अनेक बातम्या नेहमीच वाचायला मिळतात. मात्र, बळीराजाचे आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यातीलच घारगाव (ता. संगमनेर) येथील नवनाथ आहेर या तरुण पशुपालकाने आपल्या लाडक्या ''माउली'' बैलाला कानातील एक तोळे वजनाची सोन्याची बाळी केली आहे. पशुपालकाच्या अनोख्या प्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.