शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे; पिके संपली, दुबार पेरणीही वाया

farmer waiting for rain
farmer waiting for rainGoogle
Updated on

पारनेर (जि. नगर) : कमी पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील अनेकांची पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे ती वाया गेल्यात जमा आहेत. चारापिकेही सुकू लागल्याने दूधउत्पादक अडचणीत आले आहेत. पहिल्या पावसाने काही ठिकाणी पेरणी झाली होती, परंतु पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. पाऊस नसल्याने तीही फेल ठरली आहे.

तालुक्यात नगदी पैसा देणारे व कमी कालावधीत येणारे पीक म्हणून वाटाणा पिकाकडे पाहिले जाते. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी वाटाणा पिकाकडे वळले आहेत. पारनेरसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाटाणा पीक घेतले जाते. मात्र, यंदा पावसाने ताण दिल्याने वाटाणा पिकाचे मोठे नुकसान झाले. कमी पावसामुळे उगवण कमी झाली आहे. नंतर पावसाने ताण दिल्याने त्यास शेंगा कमी लागल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यंदा तालुक्यात चार हजार ८२५ हेक्टर क्षेत्रावर वाटाण्याची पेर झाली होती. तालुक्यात पहिला एक पाऊस चांगला झाला. त्यानंतर मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे नंतर कमी ओलीवर पेरलेल्या वाटाण्याची उगवण अतिशय कमी झाली आहे. सुरवातीस पेरलेल्या वाटाण्याची चांगली उगवण झाली. मात्र, त्यावेळी पेरही कमी झाली होती. पहिली पेर झालेल्या वाटाण्यास ६० ते ७५ रुपये किलो असा चांगला बाजारभाव मिळाला. त्या शेतकऱ्यांना फायदा झाला. मात्र, त्यांची संख्या कमी आहे.

farmer waiting for rain
HSC Result 2021 : नगर जिल्ह्याचा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला

नंतर कमी ओलीवर पेरणी केलेल्या वाटाण्याची उगवण कमी होऊन शेंगाही कमी लागल्या. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळूनही शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा तोटा सोसावा लागला. तालुक्यात आणि विशेषतः कान्हूर पठार परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात वाटाणा पीक घेतले जाते. शेतकरी खरीप हंगामातील पैसा देणारे पीक म्हणून वाटाणा पिकाकडे पाहतात. यंदा चार हजार ८२५ हेक्टरवर साडेचारशे टन बियाण्याची पेर झाली. बियाण्याचा दर ४० किलोसाठी चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपयांपर्यंत होता. ६० ते ७५ दिवसांत या पिकाखालची जमीन दुसऱ्या पिकांसाठी मोकळी होते.

तालुक्यात वाटाणा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. खरीप हंगामातील वाटाण्यास चांगला बाजार मिळतो. चांगला पाऊस झाला तर उत्पन्न चांगले मिळते. मात्र, खरिपात पाऊस बेभरवशाचा असतो. विहिरीतही पाणी नसते, त्यामुळे हे पीक बेभरवशाचे ठरते. उत्पादन अतिशय कमी होते. या हंगामात जिरायती क्षेत्रावरही पावसाच्या पाण्यावर वाटाणा केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेर होते. शेतकरी आर्कल, गोल्डन, दिल्ली, नेचर एपी-३, बुंदेल व अनमोल आदी वाणांसह काही स्थानिक वाणाची पेर करतात. पारनेरसह सुपे परिसरात शहांजापूर, अपधूप, हंगे, कान्हूर पठार परिसरातील विरोली, वेसदरे, गोरेगाव, पिंपळगाव तुर्क, गारगुंडी, पिंप्री पठार, वडगाव दर्या, पिंपळगाव रोठा, किन्ही, तसेच सोबलेवाडी, पुणेवाडी, करंदी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वाटाण्याची पेर झाली होती.

बाजारभाव चांगला मिळाला, तर तालुक्यात केवळ वाटाणा पिकातून १५ ते २० कोटी रुपये सहज मिळू शकतात. मात्र, यंदा पाऊस न झाल्याने व विहिरीही कोरड्या असल्याने अनेकांचे पीक वाया गेले. अनेक शेतकरी तोट्यात गेले.

farmer waiting for rain
श्रावणातही 'देऊळ बंद'; हिंदुत्ववादी संघटना, देवस्थानांचा आक्रमक पवित्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()