अकोले : निळवंडे कालव्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. कालव्याचे अस्तरीकरण करावे, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाच्या सुनीता भांगरे व युवा नेते अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली महिला शेतकऱ्यांनी निळवंडे कालव्याच्या केबिनचे व गेटचे कुलूप तोडून चाक बंद करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने मध्यस्ती केली.
निळवंडे धरणाच्या कालव्यांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सुनीता भांगरे व युवानेते अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे कालव्याचे चाक बंद आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने बाधित शेतकरी जमा झाले होते. संबंधित अधिकारी हापसे व माने यांनी चर्चा करण्याचा प्रयन्न केला.