भगवानगड पाणीयोजना मंजुरीचे ‘फटाके’

भाजप-राष्ट्रवादी-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई
भगवानगड पाणीयोजना मंजुरीचे ‘फटाके’
भगवानगड पाणीयोजना मंजुरीचे ‘फटाके’sakal
Updated on

पाथर्डी : तालुक्यातील भगवानगडासह ४६ गावांना पाणीपुरवठा (water supply) करणाऱ्या सुमारे १९० कोटी रुपये खर्चाच्या पाणीयोजनेला आज मुंबई (mumbai) येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली. मात्र, ही योजना नेमकी कोणी मंजूर केली, या विषयावरून भाजप-राष्ट्रवादी व शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या योजनेला मंजुरी मिळताच आज राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवीत आनंदोत्सव साजरा केला. भगवानगडासह ४६ गावांना जायकवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करावा, अशी जुनी मागणी होती. या विषयावर एक समितीही स्थापन करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या टंचाई आढावा बैठकीत या विषयावर आमदार मोनिका राजळे, प्रताप ढाकणे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, समितीचे अध्यक्ष संजय बडे यांनी मुश्रीफ यांचे लक्ष वेधले होते.

आज मंत्रालयात मुश्रीफ, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, सहसचिव अभिषेक कृष्णा, क्षितिज घुले, शिवशंकर राजळे, संजय बडे, बंडू बोरुडे, वैभव दहिफळे उपस्थित होते.

भगवानगड पाणीयोजना मंजुरीचे ‘फटाके’
'सहकार परिषदेतून भाजपचा साखर कारखानदारीत शिरकाव'

जानेवारीत निविदा

या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. पुढील वर्षात १५ जानेवारीपर्यंत निविदा काढली जाणार आहे. २० फेब्रुवारीला प्रत्यक्षात कामास सुरवात केली जाईल, असे आदेश गुलाबराव पाटील यांनी दिले. या योजनेत मोहटादेवी गड व तारकेश्वर गडाचाही समावेश करावा, अशी मागणी गडाख व राजळे यांनी केली. ही योजना मंजूर होताच मात्र श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. आघाडीत सहभागी असलेल्या व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज शहरात आपल्या पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत व फटाके उडवीत, ही योजना आम्हीच मंजूर केल्याचा दावा केला. याशिवाय सोशल मीडियावरही या विषयावर आज दिवसभर श्रेयवादाची लढाई सुरू होती.

आमच्यामुळेच योजना मंजूर : आमदार राजळे

पाथर्डी : आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे भगवानगड व ४६ गावे पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, की २०१७ मध्ये मी व माजी आमदार (स्व.) राजीव राजळे यांनी देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राम शिंदे, पंकजा मुंडे यांच्याकडे १० मे २०१७ रोजी पत्राद्वारे मागणी केली होती.योजनेच्या सर्वेक्षणासाठी १९ लाख रुपयांची निविदाप्रक्रिया झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला या योजनेच्या सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, सर्वेक्षण व्यवस्थापन, आराखडा तयार करण्यासाठी पुरेसा निधी मिळण्यास विलंब होऊन, या योजनेचे काम संथ गतीने होत राहिले. मध्यंतरी झालेले सत्तांतर व कोरोना लॉकडाउनमुळे कोणत्याच योजना मंजूर झाल्या नाहीत. २०२१ पासून मी पुन्हा भगवानगड व ४६ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, हसन मुश्रीफ, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरेंकडे पाठपुरावा केला.

भगवानगड पाणीयोजना मंजुरीचे ‘फटाके’
अहमदनगर : माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी पुन्हा बांधले शिवबंधन

आघाडी सरकारचेच श्रेय : प्रताप ढाकणे

पाथर्डी : हे काम आघाडी शासनाने केले आहे. इतरांनी त्याचे श्रेय घेऊ नये. या योजनेच्या मंजुरीसाठी मी व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी पाठपुरावा केला होता, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी दिली. याविषयी बोलताना ढाकणे म्हणाले, की चार महिन्यांपूर्वी आपण व घुले यांनी ही योजना तालुक्याच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे, हे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जयंत पाटील यांना सांगितले होते. ही योजना व्हावी, यासाठी आम्ही आग्रही असल्याने, या विषयावर बैठकसुद्धा घेण्यात आली होती. यानंतर या योजनेचे सर्वेक्षणसुद्धा करण्यात आले. त्यानंतर पुन्हा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी मुश्रीफ यांनी चर्चा करून, आज मुंबईत बैठक झाली.या बैठकीत ही योजना मंजूर झाली आहे. लवकरच या कामाला सुरवात होईल. जे आज या योजनेच्या मंजुरीचे श्रेय घेऊ पाहत आहेत, त्यांनी मागील पाच वर्षांत युतीचे शासन असताना ही योजना का मंजूर केली नाही?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()