अहमदनगर : शिवसेनेपासून (Shivsena) दुरावलेले माजी नगरसेवक सचिन जाधव पुन्हा स्वगृही परतले आहेत. आज ‘मातोश्री’वर मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन घालत त्यांनी पुन्हा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या पुढाकारातून हा प्रवेशसोहळा आज पार पडला.
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमास संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, मदन आढाव उपस्थित होते. सचिन जाधव १९९० मध्ये बालशिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. (स्व.) अनिल राठोड यांचे ते विश्वासू होते. २०१३ च्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले.
२०१५ मध्ये शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाची निवडणूक लढविली. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताने त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर २०१६ मध्ये शिवसेनेने त्यांना स्थायी समिती सभापतिपदाची संधी दिली. या कार्यकाळात त्यांनी शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावली. २०१८ च्या महापालिका निवडणुकीत जाधव यांनी शिवसेनेची साथ सोडत बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढविली. युवा सेनेचे प्रमुख विक्रम राठोड यांनी मागील आठवड्यातच, शिवसेना सोडून गेलेल्यांची घरवापसी होणार असल्याचे सूतोवाच केले होते, त्याची सुरवात आज सचिन जाधव यांच्यापासून झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.