विश्वास संपादन केला अन् कांदा व्यापाऱ्याला घातला 34 लाखांचा गंडा

fraud crime
fraud crimeesakal
Updated on

नगर तालुका : परप्रांतीय कांदाव्यापाऱ्यांनी नगरच्या बाजार समितीतील कांदाव्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करीत मोठ्या प्रमाणावर कांद्याची खरेदी करून ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेशातील तीन व्यापाऱ्यांवर कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात नितीन दत्तात्रेय चिपाडे (सारसनगर) यांनी फिर्याद दिली. चिपाडे यांचा कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, चिपाडे अँड कंपनी नावाने मार्केट यार्डमध्ये, तसेच नेप्ती उपबाजार समितीत ऑफिस आहे. ते शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून तो परराज्यांतील व्यापाऱ्यांना विक्री करतात.

आधी विश्वास संपादन केला अन् केली फसवणूक

सन २०१९ मध्ये आंध्र प्रदेशातील गाजूवाका (जि. विशाखापट्टणम) येथील कांदाव्यापारी बी. रामकृष्णा हे नगरला कांदाखरेदीसाठी आले. त्यावेळी त्यांची चिपाडे यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांचा कारभार पाहणारे पंदरला रमणा व जी. सन्यासी राजू यांच्याशीही त्यांची ओळख झाली.

fraud crime
'शरद पवारांनी ठरवलंय... 2024 मध्येही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री'

सुरवातीला १५ जून २०२० रोजी रामकृष्णा यांनी चिपाडे यांना फोन करून, ५० हजार रुपये बँक खात्यात पाठवतो, मला कांदा पाठवा, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी २५ टन कांदा आंध्र प्रदेशात पाठविला. नंतर तिघांनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे चिपाडे यांनी २२ जून २०२० ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत त्यांना ४० ट्रक कांदा (१० लाख टन) पाठविला. त्या मालाची एकूण किंमत २ कोटी ६ लाख ९१ हजार ४४७ रुपये असून, त्या तिघांनी चिपाडे यांना टप्प्याटप्प्याने १ कोटी ७२ लाख ८८ हजार ५०० रुपये पाठविले. त्यानंतर मात्र, उर्वरित ३४ लाख २ हजार ९४७ रुपये वारंवार संपर्क करूनही त्यांनी दिले नाही.
चिपाडे यांनी थेट आंध्र प्रदेशामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली, मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने, चिपाडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तिघा कांदा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

fraud crime
राज्यात पुन्हा पावसासह गारपिट होणार | Weather Update

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.