श्रीगोंदे : 'त्या' भोंदुबाबांचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

fraud
fraudesakal
Updated on

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : पैसे दुप्पट करुन देतो, अशी अशी बतावणी करुन एका व्यावसायिकाला तब्बल साडेचार लाखाला गंडा घालण्यात आला होता. अखेर श्रीगोंदे पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही भोंदुबाबांना अटक केली करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

अशी झाली झाली होती फसवणूक...

संतोष साहेबराव दवकर व अशोक फकिरा चव्हाण हे दोघे संशयित करमाळा परिसरात भिक्षा मागण्यासाठी गेले होते. तेथे त्यांची कुशन व्यावसायिक दत्तात्रेय महादेश शेटे (करमाळा, जि. सोलापुर) यांच्याशी भेट झाली. त्यावेळी आरोपींनी शेटे यांना तुम्ही आर्थिक संकटात असल्याची थाप मारली व ती खरी निघाली. चर्चेतून आम्ही यापुर्वी काही कर्जा बुडलेल्या लोकांना आधार देत त्यांचे पैसे पाचपट करुन दिल्याचे सांगितले. मोबाईलवरील बोलण्यातून साडेचार लाखांची रक्कम दुप्पट करुन देण्याचे ठरले. शेटे यांचे एक नातेवाईक श्रीगोंद्यात राहतात. त्यामुळे हिरडगाव फाटा येथील जागा निश्चित करण्यात आली. फिर्यादीने लिंबू, काळीबाहुली, फुले, अगरबत्ती या साहित्यासोबत दुप्पट झालेले पैसे घेवून जाण्यासाठी चक्क भली मोठी पत्र्याची पेटीही आणली होती. ठरल्याप्रमाणे भोंदुबाबांनी पुजा मांडली व नंतर मोटारीच्या डीकीत ठेवलेल्या पैशासाठी डोळे बंद करुन प्रदक्षिणा घालायला लावल्या. दुसऱ्या दिवशी डीकीमधील पेटी उघडण्याचा आदेशही महाराजांनी शेटे यांना दिला होता. या विधी उरकुन आरोपींनी तेथून काढता पाय घेतला. शेटे यांनी डोळे बंद केले त्याचवेळी साडेचार लाखांची रक्कम आरोपींनी ताब्यात घेतली होती.

fraud
पोलिसांनी शोधून दिले दीड लाख किमतीचे १२ मोबाइल

मोबाईल चोरला आणि पितळ उघडे पडले.....

आरोपींनी जाताना शेटे यांना मोटारीतील मोबाईल चोरला. शेटे पुजा करुन निघाल्यानंतर त्यांना मोबाईल गायब असल्याचे लक्षात आले. त्यांना सगळाच संशय आल्याने पेटी उघडल्यानंतर ती रिकामी असल्याचे व ते फसले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी श्रीगोंदे पोलिस ठाणे गाठले. या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी उपनिरीक्षक दिलीप तेजनकर, अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर, प्रकाश मांडगे यांनी प्रयत्न केले.

पावणेचार लाखांची रोकड जप्त

हिरडगाव फाटा (ता. श्रीगोंदे) येथे ही लूट भोंदुगिरीचा प्रकार करुन करण्यात आली होती. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत फिर्यादी व आरोपींच्या मोबाईल संभाषणावरुन आरोपींचा शोध लावला. यापुर्वी पुणे जिल्ह्यात या दोघांनी अशीच फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. अखेर श्रीगोंदे पोलिसांनी या प्रकरणी पुण्याहून दोघा भोंदुबाबांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पावणेचार लाखांची रोकडही मिळविण्यात यश आले आहे.

fraud
मृत्यूच्या दाढेतून वाचवला चिमुरड्याचा जीव; धाडसी मातेचा महसूलमंत्र्यांकडून गौरव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()