Army मध्ये नोकरीच्या आमिषाने घालायचा लाखोंचा गंडा; भामटा गजाआड

भारतीय सैन्य दलात नोकरीचे आमिष दाखवून एका भामट्याने अनेक बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
bogus Army recruitment suspect arrested
bogus Army recruitment suspect arrested esakal
Updated on

राहुरी (जि. अहमदनगर) : भारतीय सैन्य दलात (Indian Army) नोकरीचे आमिष दाखवून एका भामट्याने अनेक बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा शुक्रवारी (ता. 18) रात्री राहुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. सदर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

भामटा सांगतो, मी तर सैन्यादलात 'कर्नल'

नवनाथ सावळेराम गुलदगड (रा. आंग्रेवाडी, ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आर्मीचे कपडे व इतर सरंजाम जप्त केले आहेत.

bogus Army recruitment suspect arrested
कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या ‘बिग मी इंडिया’च्या सोमनाथ राऊतला बेड्या

लक्ष्मीकांत विनायक दिवे (वय २८, रा. कणगर, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, वांबोरी येथे नवनाथ गुलदगड याची नोव्हेंबर २०१९ मध्ये भेट झाली. त्याने आपण भारतीय सैन्यदलात कर्नल पदावर असल्याचे सांगून आर्मीच्या ड्रेस मधील फोटो दाखविले. सैन्यदलातील अधिकारी गुप्ता यांच्याशी ओळख असून, नोकरीला लावून देतो. असे आमिष दाखविले. त्यासाठी मागणी केल्याप्रमाणे डिसेंबर २०१९ मध्ये दीड लाख रुपये दिले.

लाखोंचे घातलेत गंडे

जानेवारी २०२० मध्ये पुणे येथे भरती प्रक्रिया असल्याचे त्याने सांगितले. परंतु, नोकरीचे काम केले नाही. मे २०२० मध्ये पुन्हा भेटल्यावर त्याने ऑगस्ट २०२० मध्ये फास्ट प्रोसेस भरती प्रक्रिया होणार असल्याचे सांगून आणखी दोन लाखांची मागणी केली. त्याच्या बँक खात्यावर २२ मे २०२० रोजी पन्नास हजार, २ जुलै २०२० रोजी पन्नास हजार, ६ जुलै २०२० रोजी एक लाख रुपये टाकले. नंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. आणखी अडीच लाखांची मागणी केली. तीही पूर्ण केली.

नंतर मेडिकलचे कारण सांगून आणखी दोन लाख रुपये घेतले. असे आठ लाख रुपये वेळोवेळी घेतले. नंतर त्याच्यावर पोलिस केस झाली. त्याने फोन घेणे बंद केले. गुलदगड कुठेही नोकरीस नाही. तो टुकार आहे. बेरोजगार तरुणांची फसवणूक करतो. अशी माहिती एका मित्राकडून समजली. सुयोग संजय ढगे (रा. म्हैसगाव, ता. राहुरी) यांच्याकडून अडीच लाख, दत्तात्रय अशोक वाघ (रा. लोहगाव, ता. नेवासा) यांचेकडून साडेतीन लाख, अक्षयकुमार रामदास मोकाटे (रा. इमामपूर, ता. नगर) यांचेकडून साडेतीन लाख रुपये घेऊन, त्यांचीही माझ्यासारखी फसवणूक केल्याचे समजले आहे. असेही दिवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

bogus Army recruitment suspect arrested
डॉक्‍टरांच्या क्रेडिट कार्डमधून परस्पर वटवले 74 हजार

''भारतीय सैन्यदलात नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून, आरोपी गुलदगड याने आतापर्यंत दहा बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याने नगर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर जाळे पसरविले असण्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्या तरुणांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. असे आवाहन आहे.'' - प्रताप दराडे, पोलीस निरीक्षक, राहुरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.