उपजिल्हा रुग्णालयाचे "आरोग्य" सुधारणार, दीड कोटींचा निधी

ग्रामीण रूग्णालय
ग्रामीण रूग्णालय
Updated on

कर्जत : आमदार रोहित पवार यांनी मतदार संघाबरोबरच राज्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी केलेले काम मोठे आहे. कर्जत-जामखेड बरोबरच आसपासच्या तालुक्यातील नागरीकांच्या आरोग्यासाठी आता त्यांनी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रिया गृह (ऑपरेशन थेटर) उभारण्यासाठी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. (Fund of Rs. 1 crore 50 lakhs for Karjat Sub-District Hospital)

ग्रामीण रूग्णालय
हटके ः एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी!

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही आरोग्यदायी पर्वणीच आहे. सध्या नागरिकांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नगर, पुणे, मुंबई अशा शहरी भागातील खासगी रुग्णालयात जाण्याची नामुष्की येत होती, असे असले तरी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसलेल्या नागरीकांना त्यासाठी लागणारा वेळ, यात होणारा खर्च पेलवणारा नसतो, त्यामुळे प्रसंगी अनेकांना जीवालाही मुकावे लागते.

ही अडचण लक्षात घेऊन आमदार पवारांनी मंजूर करून आणलेल्या शस्त्रक्रिया गृहामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे. रुग्णांच्या सामान्य शस्त्रक्रियांबरोबरच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियादेखील स्थानिक पातळीवर यशस्वीरित्या पार पडणार आहेत. अद्ययावत शस्त्रक्रिया गृहामुळे उपजिल्हा रुग्णालयास महत्व प्राप्त होणार आहे.

आरोग्य आणि सुरक्षितता, अद्ययावत शस्त्रक्रिया साहित्य, अल्पखर्चिक उपचार नियोजन व व्यवस्थापन, पर्यावरणीय अनुकुल पद्धत या सारख्या अनेक बाबींनी परिपूर्ण असलेल्या या शस्त्रक्रिया गृहाचे नागरिकांना फायदे होणार आहेत. सर्व सुविधा येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफतच मिळणार असल्याने रुग्णांसाठी ही आनंदाची बाब आहे.

आमदार रोहित पवारांनी कोरोना काळातही आरोग्यासाठी लागणारी उपकरणे व सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी असलेली त्यांची तळमळ आणि त्यांनी घेतलेली काळजी दिलासा देणारी ठरली आहे. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात पहिल्यांदाच सुरू होणाऱ्या अभिनव उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

सुविधांचा तुटवडा भरून काढणार

मतदारसंघात आरोग्याबाबत असलेल्या सुविधांचा तुटवडा भरून काढण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी नागरीकांना आता शहरी भागात जाण्याची गरज भासणार नाही. शिवाय त्यांचा वेळ आणि होणारा खर्चही वाचणार आहे, याचे मला समाधान वाटते. या कामासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले त्यांचे मी आभार मानतो'

- रोहित पवार, आमदार

(Fund of Rs. 1 crore 50 lakhs for Karjat Sub-District Hospital)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.