घरगुती गॅस सिलिंडरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

gas cylinder
gas cylinderesakal
Updated on

अहमदनगर : ग्राहकांच्या घरपोच गॅस सिलिंडरमधील काही गॅसची चोरी करून तो व्यावसायिकांना देणारे रॅकेट पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. शहरातील सिव्हिल हडको परिसरातील एका बंद खोलीत हा प्रकार सुरू होता. (gang-arrested-for-stole-home-gas-cylinder-marathi-news93)

रॅकेट पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश

तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे यांना खबऱ्याकडून याबाबत माहिती मिळाली. सिव्हिल हडको भागातील रहिवासी बाळासाहेब गायकवाड यांच्या भाडेतत्त्वावरील खोलीमध्ये काही जण घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस काढून व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरत होते. तिघांच्या ताब्यातून ४३ गॅस सिलिंडर हस्तगत करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक मेढे यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल शकील सय्यद, अविनाश वाकचौरे, अहमद इनामदार, वसीम पठाण, शैलेश गोमसाळे, सचिन जगताप, अनिकेत आंधळे, अभिजित बोरुडे यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. ३०) दुपारी तेथे छापा घातला. आर. टी. कराचीवाला गॅस एजन्सीचे घरगुती वापराचे ४३ गॅस सिलिंडर तेथे आढळून आले. या सिलिंडरमधील प्रत्येकी दोन किलो गॅस रिफिलिंग करून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरला जात होता. सिलिंडरच्या सीलवर गरम पाणी टाकून ते पूर्ववत केले जात होते.

गुन्हा दाखल

पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भगवानराम गिरिधारीराम बिष्णोई (डिलिव्हरी बॉय वय २३, मूळ रा. राजस्थान, हल्ली रा. बाळासाहेब गायकवाड यांचे घर, सिव्हिल हडको), भजनलाल जगदीश बिष्णोई (वय २१, सिव्हिल हडको, नगर) आणि एक अल्पवयीन मुलगा (रा. राजस्थान) या तिघांना अटक करण्यात आली. ज्वलनशील पदार्थ बाळगणे, जीवितास धोका निर्माण करणे, तसेच जीवनावश्‍यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल

या खोलीत घरगुती गॅसचे ४३ सिलिंडर, बजाज कंपनीची आर. टी. कराचीवाला भारत गॅस नाव लिहिलेली मालवाहू ॲपे रिक्षा (एमएच १६ एई ५८३३), गॅस भरण्यासाठी लागणारा लोखंडी पाइप, दोन वजन काटे, सूर्या कंपनीची गॅस शेगडी, नळी व रेग्युलेटर, एक लायटर, स्टीलचे पातेले, तांब्या, असा एकूण ९३ हजार १७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

gas cylinder
तरुणीचे अपहरण करून केला अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.