(video) जागतिक पर्यावरण दिन विशेष : मुळा-प्रवरा-गोदावरी कचऱ्याच्या विळख्यात

Garbage increased in Mula-Pravara-Godavari river
Garbage increased in Mula-Pravara-Godavari river
Updated on

नेवासे : जागतिक पर्यावरण दिन उद्या (शुक्रवारी) सर्वत्र साजरा होत असताना, तालुक्‍याच्या जीवनदायिनी मुळा-प्रवरा-गोदावरी नद्या आता प्रदूषणाबरोबरच कचऱ्याच्या विळख्यात अडकल्या आहेत. या नद्यांच्या स्वच्छतेबाबत व शुद्धतेबाबत सामूहिक प्रयत्न गरजेचे बनले आहेत.

स्वच्छतेकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे नदीचे आरोग्य बिघडत असून, नागरिकांच्या आरोग्याबरोबरच निसर्गसाखळीतील महत्त्वाचा दुवा असलेले जलचर मृत्युमुखी पडत आहेत. मुळा-प्रवरा-गोदावरी या तिन्ही नद्या नेवासे तालुक्‍यातून वाहत असून, त्यांचा संगम तालुक्‍यातीलच टोका (प्रवरासंगम) येथे असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी होतो. त्रिवेणी संगम असलेल्या या नद्यांची स्वच्छता व सुशोभीकरण होण्याची गरज आहे.

नदीभोवती कचऱ्याचा विळखा

सध्या नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे सगळा गाळ व कचरा काठावर आला आहे. त्याची साफसफाई त्वरित करणे गरजेचे आहे. 
अमर्याद घनकचरा, प्लॅस्टिक, जनावरे व कपडे धुणाऱ्यांची वाढती संख्या, टोका येथील सिद्धेश्वर व कायगाव येथील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात या नद्यांच्या घाटांवर किंवा नदीकाठी रोज शेकडो प्लॅस्टिक गोण्यांतून होणारे रक्षाविसर्जन, दशक्रिया विधी, तेरावा, श्राद्ध यात विविध विधी, जेवणासाठी लागणारे प्लॅस्टिक पात्र, द्रोण व ग्लास, मृत व्यक्तींचे जुने-नवे कपडे, चपला, अमावास्या व पौर्णिमेला गंगास्नान करून नद्यांत सोडून दिलेले जुने कपडे, नवसाचे शेकडो नारळ, दारूच्या बाटल्या, पान-फुले, प्लॅस्टिक पिशव्या, नदीत विसर्जित केलेल्या देवदेवता, मृतांच्या काचेच्या फोटो फ्रेम आदी कचऱ्याचा विळखा नदीभोवती पडला आहे.

स्नानाविनाच परत

सिद्धेश्वर व रामेश्वर येथे महाशिवरात्र, श्रावणी सोमवारसह अधिक महिन्यानिमित्त भाविकांची स्नानासाठी गर्दी होते. मात्र, पाण्याची स्थिती पाहिल्यानंतर अनेक जण स्नानाविनाच परतताना अनेकदा पाहायला मिळतात. 

असह्य दुर्गंधी

वाढत्या प्रदूषणामुळे नदीपात्र असह्य दुर्गंधीने ग्रासले आहे. गाळातील काचा व इतर घातक वस्तू मासेमारी, गंगास्नान करणाऱ्यांना किंवा पोहणाऱ्यांना इजा पोचवत आहेत. पोहल्यानंतर अनेकांना अंगाला खाज सुटणे, डोळे लाल होणे आदी आजारांना सामोरे जावे लागत आहे. 

प्लॅस्टिकचे साहित्य नदीत

सिद्धेश्वर व रामेश्वर येथे नगर, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील शेकडो व्यक्ती रोज रक्षाविसर्जन, दशक्रिया विधीसाठी येतात. रक्षा, जुने कपडे, काचा, प्लॅस्टिकचे साहित्य नदीत टाकून देतात. त्यामुळे नदीसह परिसरात मोठी अस्वच्छता झाली आहे. 
- चंद्रकला लकारे, पुजारी, श्री घटेश्वर मंदिर, टोका 

मच्छीमारी करताना पायांना जखमा

गंगास्नानासाठी येणारे नागरिक येथे जुने कपडे, प्लॅस्टिक, काचेचे साहित्य नदीत, काठावर टाकून नदीपात्र व परिसर अस्वच्छ करतात. यामुळे मच्छीमारी करताना अनेक वेळा पायांना जखमा होतात. रोज आम्हालाच येथे स्वच्छता करावी लागते. 
- शिवाजी बर्डे, मच्छीमार, टोका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.