घोडेगावात विक्रमी 550 ट्रक कांद्याची आवक

घोडेगावात विक्रमी 550 ट्रक कांद्याची आवक
Updated on

सोनई (अहमदनगर) : शनिवारी नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात ८१५८६ हजार गोणी (५५० ट्रक) कांद्याची विक्रमी आवक झाली. एक नंबर कांद्यास दोन हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला. चार तासात साडे पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

घोडेगावात विक्रमी 550 ट्रक कांद्याची आवक
सात कोटी रुपये फसवणूक प्रकरणातील एका आरोपीस नाशिक येथून अटक

कोरोना स्थितीमुळे तीन महिने लिलाव बंद होता. मागील पंधरवड्यात लिलाव सुरु झाले असून अधिक पावसाची शक्यता लक्षात घेवून शेतकरी कांदा घेवून येत आहेत. शुक्रवारी सायंकाळ पासून शेतक-यांनी ट्रॅक्टर, टॅम्पो व बैलगाडीतून कांद्याच्या गोण्या आणून टाकल्या. सकाळी सुध्दा कांदा घेवून आलेल्या वाहनांची मोठी गर्दी आवारात झाली होती. सध्या लहान आकाराचा व काही प्रमाणात भिजलेला कांदा अधिक येत असल्याने भाव दोन हजाराच्या आसपास रखडला आहे.

घोडेगावात विक्रमी 550 ट्रक कांद्याची आवक
वडापावमुळे सापडले सोनई गावची झोप उडवणारे चोरटे

शनिवारी बाजार समितीच्या सर्व आडतदारांच्या दुकानासमोर कांदा गोण्यांची रास लागली होती. वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शनिवारी एक नंबर कांद्यास १९०० ते २२०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. दोन नंबर कांद्यास चौदाशे ते सोळाशे तर तीन नंबर कांद्यास पाचशे ते आठशेचा भाव मिळाला. गोल्टी कांद्यास एक ते दीड हजाराचा भाव मिळाला. चार तासात साडे पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तीन हजार ९८८ शेतक-यांनी विक्रीसाठी कांदा आणला होता.

घोडेगावात विक्रमी 550 ट्रक कांद्याची आवक
'शनि' चा पहिला शनिवार सुनासुनाच; सोनई परिसरात कडकडीत लाॅकडाऊन

कोरोना स्थिती लक्षात घेवून बाजार समितीने शासन नियमांचे पालन करावे असे आवाहन केले असले तरी प्रत्यक्ष भेटीत येथे अनेकांच्या चेह-यावर मास्क दिसला नाही. लिलाव दरम्यान कुठेही सोशल डिस्टन्सिग दिसले नाही. येथील गर्दी पाहून अनेकांनी घोडेगावातील जनावरांचा बाजार व आठवडे बाजार सुरु करावा अशी मागणी केली आहे.

घोडेगावात विक्रमी 550 ट्रक कांद्याची आवक
सोनई ग्रामपंचायतीमधील सदस्यांची अशीही दर्यादिली

आज घोडेगाव येथे जिल्ह्यात सर्वाधिक आवक झाली आहे. कांदा काढणी दरम्यान पावसाचा फटका बसलेला कांदा सध्या मोठ्या प्रमाणात येत आहे. पुढील महिन्यात निश्चित भावात वाढ होईल.

- संतोष वाघ, व्यापारी, घोडेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()