कोल्हार (जि.अहमदनगर) : गेल्या दीड वर्षापासून, मधल्या काही काळाचा अपवाद वगळता कोरोनामुळे (corona) मंदिरे बंद (temple) आहेत. मंदिरांवर अवलंबून असणाऱ्यांची रोजीरोटीही यामुळे बंद आहे. राज्यातील महाआघाडी सरकारला (mahavikas aghadi) संस्कारांची व श्रद्धेची चिंता नाही, मात्र मद्यपान करणाऱ्यांची चिंता आहे. अशा सरकारला सद्बुद्धी देण्याचे साकडे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna vikhe patil) यांनी साडेतीन शक्तिपीठांच्या भगवतीदेवीला घातले.
विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघात कोल्हार, शिर्डीसह अनेक धार्मिक स्थळे आहेत. येथील व्यावसायिकांचा रोजगार धार्मिक पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मंदिरे बंद होती. त्यानंतर केंद्र सरकारने निर्बंध मागे घेतले. राज्याने मंदिरे उशिरा उघडली. अन्य राज्यांतील मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे उघडण्यात आली. दुसरी लाट सुरू झाल्यानंतर राज्याने लगेच मंदिरे बंद केली. आता पाच महिने झाले तरी मंदिरे बंदच आहेत. त्यामुळे अनेकांची रोजीरोटी बंद आहे. विविध धार्मिक संस्थांनी मंदिरे उघडण्याची मागणी केली. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तर त्यासाठी मोहीम उघडली. तरीही मंदिरे उघडायला सरकार तयार नाही. देशभरातील अन्य राज्यांत मंदिरे सुरू असताना राज्य सरकार मात्र कोरोनाचे कारण पुढे करून मंदिरे बंद ठेवत आहे, असा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.