आदर्शगाव हिवरे बाजारमध्येही पेटला रणसंग्राम, तीस वर्षांनंतर होणार निवडणूक

Gram Panchayat election in Adarsh Gaon Hiware Bazar too
Gram Panchayat election in Adarsh Gaon Hiware Bazar too
Updated on

नगर तालुका ः आदर्शगाव हिवरेबाजार ग्रामपंचायतींसाठी 30 वर्षांनंतर निवडणूक होत आहे. यापूर्वी राज्य आदर्शगाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी येथे बिनविरोध निवडणूक होत होती. तथापि, या वर्षी त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनंतर येथे निवडणूक आखाडा रंगणार आहे.

1990पासून हिवरेबाजार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत होती. मागील 30 वर्षांपासून दरवर्षी 31 डिसेंबरला गावाच्या विकासाचा आराखडा मांडून हिशेब दिला जात होता. त्यामुळे गावकारभाराबाबत कुणाचीही तक्रार नव्हती. पहिल्यांदाच व्यक्तीगत कारणातून गावाला निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. या गावात सात जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

दरम्यान, या ग्रामपंचायतीने देशापुढे अनेक आदर्श ठेवले. आदर्शगावासाठी दिली जाणारी अनेक बक्षिसे मिळविली. गावातील एकोपा, जलसंधारण, वृक्षसंवंर्धनबाबत देशातील ग्रामपंचायतींपुढे हे गाव आदर्श ठरले. यंदा निवडणूक होत असली, तरी दोन गटांमध्ये एकास-एक उमेदवार आहेत. त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार आहे. विरोधासाठी विरोध नव्हे, तर खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 

हिवरेबाजारने देशाला अनेक आदर्श घालून दिले आहेत. निवडणूक होणार असली, तरी ही लोकशाही आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य असते. सर्वांनी मिळून ज्याप्रमाणे गाव उभे केले, त्याच पद्धतीने निवडणूक व्हावी. गैरमार्गाचा वापर होऊ नये. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी प्रयत्न केले. परंतु, काहींनी ऐकले नाही. यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत काही जण अर्ज भरीत. मात्र, नंतर माघार घेत. या वेळी मात्र त्यांनी ऐकले नाही. फक्त ही निवडणूक शांततेच्या मार्गाने व्हावी, हीच अपेक्षा. 
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प कृतिसमिती, महाराष्ट्र 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.