Ahmednagar News : गाव करील ते राव काय करील?

ग्रामस्थांची वज्रमूठ; बेलपिंपळगाव अवैध धंदेमुक्त, तहसीलदारांना निवेदन
gram panchayat initiative over financial issue illegal business ahmednagar
gram panchayat initiative over financial issue illegal business ahmednagarsakal
Updated on

नेवासे : कष्टातून उभ्या राहिलेल्या अनेक संसारांची झालेली राखरांगोळी थांबावी, याकरिता गावाच्या सरपंच, महिला मंडळ व सर्वपक्षीय ग्रामस्थांनी बांधलेली वज्रमूठ यशस्वी झाली आहे. आठ दिवसांपासून गावातील सर्व अवैध धंदे बंद झाल्याने गावाला आर्थिक सुबत्तेचे गावपण पाहण्यास मिळू लागले आहे.

gram panchayat initiative over financial issue illegal business ahmednagar
Ahmednagar News : प्रशांत गडाख यांच्यासह १९ जणांवर वीज चोरीचा गुन्हा

बेलपिंपळगाव येथे राबविण्यात आलेला समजूतदारपणाचा हा फंडा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. गावात व ग्रामपंचायत मालकीच्या जागेत दारू, मटका,जुगार व अवैध धंदे सुरु होते. अनेकदा प्रशासनास तक्रार व निवेदन देऊन उपयोग होत नव्हता.

गावच्या सरपंच निकिता गटकळ, मुळा सूतगिरणीचे संचालक चंद्रशेखर गटकळ यांनी ग्रामसभा घेऊन गाव अवैध धंदेमुक्त करण्याचा ठराव घेतला. उपसरपंच गणेश कोकणे, माजी उपसरपंच बाबासाहेब भांड, सदस्य मंडळ, पोलिस पाटील संजय साठे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भीमराज साठे आणि सर्वपक्षीय ग्रामस्थ एकत्र येऊन गावाच्या हितासाठी प्रयत्न सुरू केले.

gram panchayat initiative over financial issue illegal business ahmednagar
Ahmednager : ३२ कोटींच्या जागेचा वाद चिघळला

मुख्यमंत्री, गृहमंत्री, माजी मंत्री शंकरराव गडाख, जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कमिटीने अवैध धंदे करणाऱ्यांची बैठक घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

ग्रामपंचायत जागेत सुरु असलेल्या अवैद्य धंदा मालकास नोटीस बजावण्यात आली. कुठलेही आंदोलन अथवा बळजबरी न करता गावातील सर्व अवैद्य धंदे बंद झाल्याने ग्रामस्थांत आनंदीआनंद आहे.

पोलिसांचा धाक नसल्याने गावात राजरोस अवैध धंदे सुरू होते. सर्वांनी सामाजिक जबाबदारी म्हणून एकोपा दाखविल्याने अशक्य गोष्ट शक्य झाली. यातून रोज लाखो रुपयांची बचत व भावी पिढी सुसंस्कारित होईल.

- निकिता गटकळ, सरपंच, बेलपिंपळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.