Eye Care Tips : उन्हाची तीव्रता वाढल्याने डोळ्यांवर दुष्परिणाम होत आहेत. सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांमुळे मॅक्युलर डिजेनेरेशन आणि मोतीबिंदूसारख्या रोगांचा धोका वाढत आहे. त्यामुळे कॉर्निया सनबर्न किंवा फोटोकेरायटिस होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सनग्लासेसचा वापर महत्वाचा ठरत आहे.
गेल्या एक-दीड आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे डोळ्यांच्या आरोग्य धोक्यात येण्यास सुरूवात झाली आहे.
पावसाळा, हिवाळा ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात डोळ्यांच्या समस्या जास्त प्रमाणात उदभवत आहेत. नेत्रतज्ञ डॉक्टरांकडे डोळ्याच्या समस्याचे रूग्ण वाढत आहेत. सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांमुळे डोळ्यांवर कमालीचा ताण येत आहे.
डोळे कोरडे पडून जळजळ होते. त्यातून डोळे चोळले जातात. उन्हाळ्यामुळे शरीराला घाम जास्त येत आहे. हातांमध्ये घाण, जीवाणू आणि धूळ असू शकते आणि प्रत्येक वेळी डोळ्यांना स्पर्श करताना ते डोळ्यांपर्यंत पोहोचू शकतात.
डोळ्यांच्या प्रभावी काळजीमध्ये संसर्ग टाळण्यासाठी डोळ्यांना स्पर्श करताना काळजी घेणे महत्वाचे आहे. धुम्रपानामुळे ऑप्टिक नर्व्ह मज्जातंतूंनाही नुकसान होते. धुम्रपानामुळे डोळे कोरडे होऊ शकतात. पुरेशा प्रमाणात झोप न मिळाल्याने ही डोळ्याच्या समस्या वाढत आहेत.
डोळ्यांचा थकवा घालविण्याचा उपाय...
भरपूर पाणी प्यावे.
हिरव्या पालेभाज्या, गाजर आणि व्हिटॅमिन ए असणारे इतर पदार्थ आहारात समाविष्ट करणे.
रात्री ७ ते ८ तासांची झोप घेणे.
दिवसांतून ५ मिनिटे तरी डोळ्यांचा व्यायाम करावा.
चष्म्याचा नंबर तपासून घेणे.
ॲलर्जी, मायग्रेन किंवा सायनस असा त्रास असल्यास नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा.
हात नियमितपणे धुवावेत
डॉक्टरांच्या सल्ल्याने आयड्रॉप्स घ्यावा.
डोळ्यांना थकवा येण्यामागची कारणे
१. अपुरी झोप
२. एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असणं
३. चष्म्याचा नंबर बदलणं.
४. माेबाईल, टीव्ही आणि संगणक जास्त पाहणे
५. कमी उजेडात वाचन करणं किंवा स्क्रिन पाहणे
डोळ्यांचे आरोग्य प्रत्येकाने जपले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, गाजर आणि व्हिटॅमिन ए असणारे इतर पदार्थ आहारात समाविष्ट असावेत. किमान रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्यावी, दिवसांतून ५ मिनिटे तरी डोळ्यांचा व्यायाम करणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
- डॉ. प्रसन्ना खणकर, नेत्रतज्ञ, अहमदनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.