Ahmednagar Rain Update : भंडारदरा परिसरात अतिवृष्टी! घाटघर, रतनवाडी परिसरात हाहाकार; जनजीवन विस्कळीत

भंडारदरा परिसरात रविवारी अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासात घाटघरला ४७५ मिलिमीटर व रतनवाडी येथे २४९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Ahmednagar Rain Update
Ahmednagar Rain UpdateSakal
Updated on

अकोले : तालुक्यातील भंडारदरा परिसरात रविवारी अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासात घाटघरला ४७५ मिलिमीटर व रतनवाडी येथे २४९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अतिवृष्टीने झाडे पडल्याने रस्ते बंद झाले. विजेचे पोल पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. ढगफुटीमुळे वातावरणात गारवा पडल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे जनावरे दगावली. बांधबंदिस्त फुटले. घरावरील कौले उडाली. काही घराच्या भिंती पडल्या. भात खाचरात पाणी साचल्याने भात पिके धोक्यात आली आहेत.

भंडारदरा जलाशयातून २७ हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. रंधा धबधब्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रवरेला मोठा पूर आला आहे. अगस्तीचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली होती.

Ahmednagar Rain Update
Ahmednagar Rain Update : अवकाळीचा अठरा घरांना तडाखा; वादळामुळे जिल्ह्यातील २६ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान

भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे भंडारदरा धरणामध्ये नवीन पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने भंडारदरा धरण साडेदहा टीएमसीच्या पुढे भरले आहे. सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९६.८८ टक्के झाला होता.

कळसुबाई शिखरावरही पाऊस सुरू असल्याने वाकी धरणावरुन १५०० क्युसेकने पाणी कृष्णावंती नदीमध्ये वाहत होते. आढळामध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला होता. मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस असून कोतूळ मुळा पात्रातून २३ हजार ७६५ क्युसेकने प्रवाह सुरू होता.

Ahmednagar Rain Update
Ahmednagar News : धोकादायक इमारतीत भरते शाळा; अस्तगाव येथील प्रकार, पालकांचा जीव टांगणीला

त्यामुळे जलाशयात १९ हजार ४३५ दशलक्ष घनफुट (७४ टक्के) साठा होता. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात उभ्या आयुष्यात इतका पाऊस पहिल्यांदा पाहिला असल्याचे ९४ वर्षीय आनंदा खाडे यांनी सांगितले.

अकोले तालुक्यातील घाटघर आणि रतनवाडी येथे १९ इंच झाला. याबाबत महसूल कृषी, पंचायत समिती विभागाकडून अहवाल मागविला आहे. नुकसान झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई दिली जाईल. ज्यांचे नुकसान झाले त्यांनी महसूल विभागात संपर्क साधावा.

- सिद्धार्थ मोरे, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.