नगर : जेऊर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; चार तास महामार्ग बंद

Flood at Jeur
Flood at JeurSakal
Updated on

जेऊर ( ता, नगर ) : सह परिसरातील बारा वाड्यात सोमवार दि. ३० रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः हाहाकार घातल्याने सीनेला या पावसाळ्यात प्रथमच पूर आला. या पावसाने जेऊरसह शेजारच्या बारा वाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर नदीचे पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. चार तास महामार्ग बंद होता. महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा सुमारे आडीच किलोमीटर लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सिना नदिच्या पुलावरुन पाणी गेल्याने महामार्ग बंद राहण्याची पहिलीच वेळ असल्याने पुराच्या पाण्याचा अंदाज येतो.


या मुसळधार पावसाने सिना व खारोळी नदीला पूर आल्याने पूराचे पाणी जेऊर बाजारपेठेत तसेच गावामध्ये घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. जेऊर गावची मुख्य बाजारपेठ पाण्यामध्ये होती. अनेक दुकानदारांचे साहित्य तर काही दुकानेच वाहून गेली आहेत. सर्वच व्यावसायिकांना पुराचा फटका बसला असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. सीनेने धोक्याची पातळी ओलांडली होती. गावात प्रवेशकरताना संतुकनाथ विद्यालयाचा पुल वाहुन गेला आहे.

Flood at Jeur
अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक गावांना पाण्याचा वेढा


ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, सरपंच सौ. राजश्री मगर व सर्व सदस्यांनी तसेच अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती बाजीराव गवारे, माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी नुकसान झालेल्या व्यावसायिकांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली आहे. मंगळवारी सकाळी सिना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ससेवाडी, वहीरवाडी येथील तलाव भरल्याने धोका निर्माण झाला होता. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, सरपंच अंजना येवले व राजेंद्र दारकुंडे यांनी नागरीकांच्या मदतीने सांडवा खोल करुन पाणी काढून दिल्याने मोठा अनर्थ टळला.

मुख्य बाजारपेठ अतिक्रमणात

जेऊर गावची मुख्य बाजारपेठ अतिक्रमणात वसलेली आहे. गावातील सीना पात्रातील व भोवतालचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी ग्रामपंचायतला दिलेले आहेत. परंतु अतिक्रमण ‌काढण्याबाबत कारवाई झालेली नाही. भविष्यात येथे मोठी दुर्घटना होवुन जिवीतहानी होवु शकते. तरी प्रशासनाने जेऊर गावातील अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Flood at Jeur
सणासुदीला तरी मंदिरे उघडू द्या : आमदार मोनिका राजळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.