मिरी (जि. अहमदनगर) : पाथर्डी तालुक्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला असला तरी मिरी, शंकरवाडी, दत्ताचेशिंगवे, रेणुकावाडी, कडगाव या भागातील पाझर तलाव कोरडे असल्यामुळे व नगर नेवासा तालुक्यातील काही तलाव पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याने मुळा धरणातून तात्काळ पाणी वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे आदेश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी मुळा पाटबंधारे विभागाला दिले आहेत.
मंत्री तनपुरे यांनी पाथर्डी व नगर तालुक्यातील जे तलाव पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्या तलाव परिसरातील शेतकऱ्यांशी सोमवारी संवाद साधला व त्यांच्या इतरही विज रस्त्याच्याबाबतचे प्रश्न जाणून घेतले. मिरी लाईनवरील १९ तलावासह नगर तालुक्यातील खोसपुरी आव्हाडवाडी, नेवासा तालुक्यातील चांदा महालक्ष्मीहिवरे येथील तलावासाठी हा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील व कार्यकारी उप अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, माजी सभापती संभाजी पालवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, युवानेते जालिंदर वामन आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.