अहिल्यानगर: लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभागातून मतदार जागृती मोहीम प्रभावीपणे राबवा. जिल्ह्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.