जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदे आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले आहेत.
अहमदनगर : जिल्ह्यात एकाच दिवशी 4475 कोरोनाबाधित रुग्ण (coronavirus patients) आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंतचा कोरोनाबाधितांच्या संख्येचा हा उच्चांक आहे. नगर शहरात सर्वाधिक 766 रुग्ण (patients) आढळून आले. त्याखालोखाल नगर तालुक्यात 468, तर संगमनेर तालुक्यात 386 रुग्ण आढळून आले. (In Ahmednagar district 4475 coronavirus patients have been found on the same day)
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत 1053, खासगी रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत 2385, रॅपिड अँटिजेन चाचणीत 1037 रुग्ण आढळून आले. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 25 हजार 114 झाली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदे आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले आहेत.
तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे :
नगर शहर 766, नगर तालुका 468, संगमनेर 386, श्रीगोंदे 300, पारनेर 286, श्रीरामपूर 283, राहाता 281, कर्जत 244, कोपरगाव 238, राहुरी 219, अकोले 204, नेवासे 156, शेवगाव 152, पाथर्डी 144, जामखेड 130. भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत 92, लष्करी रुग्णालयात 9, परजिल्ह्यांतील 106, तर परराज्यांतील 11 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या एक लाख 93 हजार 642 झाली आहे. आतापर्यंत 2173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 3103 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एक लाख 66 हजार 355 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.19 टक्के झाले आहे.
(In Ahmednagar district 4475 coronavirus patients have been found on the same day)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.