सोनई(अहमदनगर): कोरोनामुळे बंद असलेला घोडेगाव (ता.नेवासे) येथे झालेल्या पहिल्याच लिलावासाठी एकतीस हजार कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्यास दोन हजाराचा भाव मिळाला आहे. चार तासांत दोन कोटी साठ लाखाची उलाढाल झाली.
पहिलाच लिलाव असल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत आवक सुरु होती. कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजार येथील कांदा लिलाव व राज्यात प्रसिद्ध असलेला जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता. साडेतीन महिन्यात कांदा लिलावातून होणारी शंभर कोटी रुपयांची उलाढाल झाली नसल्याने परिसरातील अर्थकारणावर परीणाम झाला. गावातील अनेक युवकांची रोजीरोटी बाजार व लिलावावर असल्याने अनेक कुटुंब चिंतेत होते. (In Ghodegaon market committee, the price of onion is two thousand rupees per quintal)
आज मंगळवारी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत लिलाव झाले. काल रात्री व आज पहाटेपर्यंत बैलगाडी, ट्रॅक्टर व टॅम्पोतून कांदा गोण्यांची आवक झाली. बाजार समितीचे कर्मचारी, आडतदार, हमाल आणि शेतक-यांची लगबग पाहण्यास मिळाली. व्यवहार सुरळीत होणार असल्याने सर्वांच्या चेह-यावर आनंद पाहण्यास मिळाला. पावसामुळे आवारात दलदल झाल्याने वाहने ये-जा करताना रखडत होते.
सकाळी सात वाजता प्रत्यक्ष लिलाव सुरु झाले. लिलावास शेतकरी कमी प्रमाणात उपस्थित होते. आज ३१ हजार ६११ कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्यास क्विंटलला अठराशे ते दोन हजार भाव मिळाला. दोन नंबर कांद्यास चौदाशे ते सोळाशे तर तीन नंबरला पाचशे ते एक हजाराचा भाव मिळाला. चार तासात दोन कोटी ६० लाख ७९ हजाराची उलाढाल झाली.
सर्व व्यवहार सूरु झाले असले तरी बाजार समितीच्या वतीने कोरोना संसर्गाची पुर्ण काळजी घेतली जाणार आहे. साडेतीन महिने लिलाव बंद असल्याने समितीचे अंदाजे एक कोटीचे उत्पन्न बुडाले आहे.
- देवदत्त पालवे, सचिव, बाजार समिती
पाऊसानंतर थंड वातावरणाने कांदा खराब होण्याचा धोका असतो. लिलाव सुरु झाल्याने आनंद झाला. कपाशी बियाने,खते व मशागत खर्चासाठी अनेक शेतक-यांना अडचण होती. कांदा लिलावाने अडचण दूर होईल.
- दत्तात्रेय शेळके, शेतकरी, गोधेगाव (In Ghodegaon market committee, the price of onion is two thousand rupees per quintal)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.