श्रीगोंदे: विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. प्रचारात एकमेकांवर टीका-टिपण्णी व आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. परिणामी या गोंधळात विकासाचे मुद्दे पूर्णतः दुर्लक्षित होत आहेत. ज्या मतदारांच्या जीवावर नेते आमदारकीची स्वप्ने पहात आहेत, त्या मतदारांच्या समस्यांवर बोलायला नेतेमंडळी तयार नाहीत, असेच चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.