शहरटाकळी - मुख्यालयात न राहता घरभाडे घेण्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील पाच शिक्षकांच्या अंगलट आलेला आहे. शेवगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाचही शिक्षकांकडून घरभाडेपोटी घेतलेली सुमारे दहा लाखांची रक्कम वसूल करण्याचा आदेश दिलेला आहे. या विरोधात या शिक्षकांनी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे अपील केले होते. या प्रकरणाची सुनावणी पाटील यांच्यासमोर होऊन त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांचा आदेश कायम ठेवला आहे.