राशीन : कोरोनाने आता कुटुंबात पाय पसरायला सुरूवात केली आहे. शुक्रवारी पॉझीटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घरातील दोघाजणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राशीनकरांच्या चिंतेत भर पडली अाहे. आता कसे करायचे असा प्रश्न प्रत्येकासमोर उभा राहिला आहे. पहिल्या सहा वर्षीय मुलीसह कोरोनाच्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला मरगळ झटकावी लागेल अन्यथा अनर्थ होईल. आणि आपसूक जामखेडच्या वाटेवर जाईल.
राशीन ते पुणे आणि पुणे ते राशीन असा प्रवास केलेल्या रुग्णानंतर त्याची चौदा वर्षीय मुलगी व वृद्ध वडिलांचा आज पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. ते राहत असलेल्या परिसरातील तिच्या मैत्रिणींच्या घरी या मुलीचे येणे- जाणे होते. त्यामुळे या भागातील अनेक घरात भीतीचे वातावरण आहे. या रुग्णाच्या कुटुंबाशेजारील सर्वच कुटुंब संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करणे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक आहे. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी दाटीवाटीची वसाहत असल्याने होम क्वारंटाईन करून येथे उपयोग होणार नाही.
एकाच घरातील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे राशीनकर धास्तावले आहेत. लॉकडाऊन असूनही केवळ बाहेरच्या जिल्ह्यात ये - जा करणाऱ्यांवर.प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने राशीनमध्ये कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढु लागली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेक नाक्यावर कसून चौकशी करून त्यात बाहेर जाऊन आलेला आणि बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांना थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केल्यास कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल अन्यथा पुणे- मुंबई अशा रेड झोन मधून येणारे लोकं आपल्या सोबत कोरोनाचा वानोळा आणीत राहणार आहेत.
पोलीस प्रशासन , आरोग्य विभाग आणि तहसीलदार यांनी कुचकामी उपाययोजना न राबवता रुग्णांची संख्या वाढणार नाही यासाठी विशेष आखणी करणे गरजेचे आहे शक्य झाल्यास त्यांनी जामखेडचे तहसीलदार नाईकवाडी यांचे याबाबत मार्गदर्शन घ्यावे.
कोरोनाच्या भीतीने रुग्णाच्या संपर्कात आलेले लोक माहिती लपवत आहेत. आणि त्यामुळेच रुग्ण संख्या वाढण्याचा धोका आहे. राशीन ग्रामपंचायतीनेही मुंबई - पुणे येथून आलेल्या पाहुणे आणि स्थानिक लोकांचा सर्व्हे करून तातडीने या लोकांना क्वारांटाईन करावे वेळप्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी. असे केले तरच कोरोनाच्या कचाट्यातून राशीनकर सूटतील नाही तर दररोज रुग्ण संख्येत भर पडेल हे कटू वास्तव आहे.
या उपाययोजना करणे गरजेचे
पुणे- मुंबईवरून येणाऱ्या लोकांना चेक नाक्यावरूनच विलगीकरण कक्षात नेण्यात यावे. स्थानिक व्यक्ती कामानिमित्त रेडझोन भागात जाणार असेल तर त्यास परवानगी देऊ नये. ज्या भागात जाऊन आला आहे त्याचा पुरावा घ्यावा.
यासाठी पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात. तहसीलदार यांनी दररोज सील केलेल्या भागाचा आढावा घ्यावा.
पोलीस, आरोग्य विभाग व तहसीलदार यांनी संयुक्तपणे सक्त व कठोर उपाययोजनांची आखणी करून त्या अंमलात आणाव्यात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.