Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! चार वेळच्या अपयशानंतर शेतकरीपुत्र झाला एसआरपीएफमध्ये पोलिस

सिंदखेड राजा येथील शेतकरीपुत्र मुरलीधर अंबादास पवार याने यशाला गवसणी घातल आहे
ahmednagar
ahmednagarsakal
Updated on

शाहीद कुरेशी

मातोळा- सिंदखेड राजा येथील शेतकरीपुत्र मुरलीधर अंबादास पवार याने यशाला गवसणी घातल आहे. मुरलीधरला सैन्य, एसएससी जीडी व पोलिस भरती मध्ये सलग चार वेळा यशाने हुलकावणी दिली. परंतु खचून न जाता त्याने कठोर मेहनत, जिद्द व चिकाटीच्या बळावर राज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीमध्ये यशाला गवसणी घातली आहे.

ahmednagar
Ahmednagar News : अहमदनगरची स्टेशन्स होणार वर्ल्ड क्लास; अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ९३ कोटींचा निधी

तालुक्यातील सिंदखेड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुरलीधर अंबादास पवार याने पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण गावातीलच जि.प शाळा व छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात घेतले. तसेच बोदवड येथे अकरावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली.

त्यानंतर शासकीय नोकरीचे ध्येय उराशी बाळगून त्याने सैन्य भरती व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मुरलीधरने गावातील आई तुळजाभवानी वाचनालयात अभ्यासाची कास धरली.

ahmednagar
Ahmednagar News : पोखरी बाळेश्‍वर ‘आउट ऑफ कव्हरेज’

त्याने २०१७ मध्ये भारतीय सैन्य भरती व २०१८ मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे कॉन्स्टेबल (एसएससी जीडी) भरती मध्ये मेडिकल पर्यंत मजल मारली.परंतु अखेरच्या टप्प्यात त्याच्या पदरी निराशा आली. त्याने जिद्दीच्या बळावर नव्या दमाने पोलिस भरतीची तयारी सुरू केली. मुरलीधरने २०२१ मध्ये जळगाव व मुंबई येथे पोलिस भरतीमध्ये नशीब आजमावले. त्याने पोलिस भरतीचे मैदान गाजवले.

परंतु लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊनही कट ऑफ लिस्ट मध्ये दोन गुणांनी त्याची निवड हुकली. मुरलीधर या अपयशानेही खचला नाही. त्याने २०२३ मध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीसाठी पुन्हा कंबर कसली. अखेर या भरती मध्ये त्याने यशाच्या आकाशाला गवसणी घातली आहे.

त्याची २९ जुलै रोजी कुसडगाव गट नं. १९ अहमदनगर येथे एसआरपीएफ मध्ये निवड झाली आहे. मुरलीधरने दुर्दम्य इच्छाशक्ती व कठोर मेहनतीच्या बळावर नोकरीचे स्वप्न साकार केले आहे. या यशाबद्दल त्याचे परिसरात कौतुक होत आहे. दरम्यान, ॲड. पवन मेहेंगे यांनी मूरलीधरचा सत्कार केला. यावेळी वाचनालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मुरलीधरची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, यात तिळमात्र शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.