Inspiring Story : जिद्दीने शुभम बनला मुद्रांक निरीक्षक

साकुरीत कौतुकाचा वर्षाव ः खडतर परिस्थितीवर मात
inspiring story of shubham bhavke mpsc exam Inspector of Registration Stamps
inspiring story of shubham bhavke mpsc exam Inspector of Registration Stampssakal
Updated on

राहाता : आपल्या मुलाने क्लास वन अधिकारी व्हावे, असे स्वप्न वडिलांनी पाहिले. स्वप्नपूर्तीसाठी मुलगा झटून अभ्यास करीत होता. मात्र, वडिलांना अचानक कॅन्सरने गाठले. दवाखाना आणि महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेचा अभ्यास अशा एकाचवेळी दोन्ही आघाड्या मुलाने जिद्दीने लढविल्या. आज वडील हयात नाहीत.

त्यांच्या स्वप्नपूर्तीची बातमी काल कळली. साकुरीचा शुभम बावके मुद्रांक निरीक्षक झाल्याने गावाला आनंद झाला. साकुरी येथील शुभम बाळासाहेब बावके (वय २५) याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पंचवीसावी रॅंक पटकावली.

तो मुद्रांक निरीक्षक (क्लास वन) झाला. शेतकरी कुटुंबातील शुभमने क्लास वन अधिकारी व्हावे, असे स्वप्न त्याच्या वडिलांनी पाहिले. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तत्पूर्वी खबरदारी म्हणून त्याने कोपरगावच्या संजीवनी आभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

चांगले गुण मिळविले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे आपला मोर्चा वळविला. वडिलांना कॅन्सरने गाठल्यानंतर चांगले उपचार मिळावेत, यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. थेट अमेरिकेला जाऊन औषधे आणली.

वडिलांचा दवाखाना आणि एमपीएसची परीक्षेचा अभ्यास या दोन्ही आघाड्यावर तो एकाचवेळी लढत होता. काल परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्याने पंचवीसावी रॅंक मिळविली. क्लास वन अधिकारी होण्याचे वडिलांचे स्वप्न साकार केले. निकाल हाती पडताच त्याच्या एका डोळ्यात हसू अन् दुसऱ्या डोळ्यात अश्रू होते.

वडिलांचे स्वप्न आज साकार झाले. मात्र, स्वप्नपूर्तीचा आनंद साजरा करायला ते आमच्यात नाहीत. त्यांची खूप आठवण येते. मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. गुणवत्ता, जिद्द आणि परिश्रम सोबत असले, की स्वप्नपूर्ती साधता येते.

- शुभम बावके, मुद्रांक निरीक्षक श्रेणी एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.