शिर्डी: सलग सहा वेळा येथून निवडून गेलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ अशी शिर्डी विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी व काँग्रेसचे ज्येष्ठनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्षाची झालर या निवडणुकीला असणार आहे.