आंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत चव्हाण यांच्यावर अंदाधुंद गोळीबार

आंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत चव्हाण यांच्यावर अंदाधुंद गोळीबार
Updated on

नेवासे : गावातीलच दोघा हल्लेखोरांनी पिस्तूलातून झाडलेल्या अंदाधुंद गोळीबारात तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य व किक बॉक्सिंगचा आंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत चव्हाण (वय २५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, गोळ्या झाडून हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले आहेत. हल्ल्यामागाचे नेमके कारण समजले नाही. या प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात दोनजणांविरोधात गुन्हा दाखल आहे. (International player Sanket Chavan injured in firing)

या बाबत माहिती अशी, "संकेत चव्हाण हे मंगळवार (ता. १५) रोजी घोडेगाव येथून आपले काम आटोपून आपल्या वाहनातून बऱ्हाणपूर गावी जात असतांना ते बऱ्हाणपूर-चांदे रस्त्यावर घरापासून पाचशे फुटावर रात्रीचे नऊ वाजण्याच्या दरम्यान रस्त्याकडेला वाहन उभे करून लघुशंका करत असतांना दुचाकीवरून आलेल्या बाळासाहेब भाऊसाहेब हापसे व विजय विलास भारशंकर या गावातीच हल्लेखोरांनी पिस्तूलातून संकेत यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या.

आंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत चव्हाण यांच्यावर अंदाधुंद गोळीबार
म्युकरमायकोसिस ः लोणीत पाच महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

रात्रीची सर्वत्र शांतता असल्याने या गोळीबाराचा आवाज सर्वत्र घुमल्याने संकेतच्या वडिलांसह चुलत बंधू रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत संकेतला त्याच्याच वाहनातून प्रथम जिल्हा रुग्णालयात व नंतर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

संकेतवर बुधवारी (ता. १६) रोजी पहाटे यशस्वी शास्रक्रिया करण्यात आली. त्याच्या शरीरातून चार गोळ्या काढण्यात आल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती संकेतच्या नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कर्पे, शनिशिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांनी मोठ्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

संकेत यांनी हल्लेखोर ओळखले

संकेत यांनी गोळ्या झाडणाऱ्या बाळासाहेब हापसे व विजय भारशंकर या दोघांही हल्लेखोरांना ओळखले आहे. तशी माहिती त्यांनी दवाखान्यात घेऊन जाणारे बंधू रवींद्र यांनाही दिली. दरम्यान हल्लेखोर हे गावातीच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. ते घटनेपासून गावातून फरार आहेत. विशेष म्हणजे हे दोघे दुचाकीसह कांगोणी फाट्यावर अनेकांना दिसले.

अन्यथा आंदोलन

संकेत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर तपास न लागल्यास नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा छावा क्रांती मोर्चा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक चव्हाण, तालुका तालिम संघाचे संदीप कर्डिले, जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनचे स्वप्नील वारुळे यांच्यासह बऱ्हाणपूर ग्रामस्थांनी दिला आहे.

"या प्रकरणी आरोपी आरोपींची ओळख पटली आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाली असून लवकरच आरोपी अटक होतील.

- सचिन बागूल, सहाय्यक पोलीस निरीक्षक, शनी शिंगणापूर, ता. नेवासे (International player Sanket Chavan injured in firing)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()