International Yoga Day : अहमदनगर शहरात ‘योगा’साठी शाळा लवकर भरणार

मुलांची झोप होत नसल्याने शाळा नऊच्या अगोदर भरू नये, असा आदेश आहे. शाळा जर सकाळी भरायची असेल, तर त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक; अन्यथा अशा शाळांवर कारवाई होणार आहे.
yoga day
International Yoga Daysakal
Updated on

अहमदनगर : मुलांची झोप होत नसल्याने शाळा नऊच्या अगोदर भरू नये, असा आदेश आहे. शाळा जर सकाळी भरायची असेल, तर त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक; अन्यथा अशा शाळांवर कारवाई होणार आहे.

मात्र, या आदेशाला योग दिनामुळे शिथिलता देण्यात आलेली आहे. एक तास आरोग्यासाठी म्हणत २१ जूनला सकाळी साडेसात वाजता शाळा भरणार आहेत.

दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी २१ जून रोजी सर्व व्यवस्थपनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांचे सामूहिक योग, प्रात्यक्षिके, कार्यशाळा / सेमिनारचे आयोजन करून दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरून आपल्या

कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना सूचना निर्गमित करून योग्य ती कार्यवाही, करावी तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा,

अशा सूचना सर्व शाळांना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिल्या आहेत.

सर्व शाळांनी योग दिन शाळेत साजरा करावा, असा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केला होता. मात्र, महिला वर्गाने मागणी करून निश्चित वेळ ठरविण्यासंदर्भात विनंती केली.

त्यानंतर निश्चित वेळ ठरविण्यात आलेली आहे.

yoga day
Ahmednager : ३२ कोटींच्या जागेचा वाद चिघळला

वटपौर्णिमेनिमित्त शाळा दीड वाजेपर्यंतच

२१ जून रोजी वटपौर्णिमा सण आलेला आहे. शाळा जर दिवसभर भरली, तर महिला शिक्षकांना तो साजरा करताना अडचणी येणार असल्याने शाळा दुपारपर्यंत भरविण्यात यावी,

अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार शाळा दुपारी दीडपर्यंत भरविण्याचा आदेश शिक्षणाधिकारी यांनी जारी केलेला आहे.

सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत योगाचे धडे गिरवायचे आहेत. त्यानंतर साडेआठ ते दुपारी दीडपर्यंत शाळा भरविण्याबाबत आदेश निर्गमित केलेला आहे.

- भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

योग दिनानिमित्त शाळा भरविण्याच्या वेळेत शिथिलता देण्यात आलेली आहे. मुलांच्या आरोग्यासाठी योग दिन साजरा केला जात आहे. या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.

-अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग.

yoga day
Ahmednagar News : आता गुरुजींच्या मोबाईलमध्ये येणार बँक; RBIचे सतीश मराठे यांच्या हस्ते ॲपचे लोकार्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com