सहा वर्षांपासून तारीख पे तारीख

येळपणे जमीन घोटाळ्याची चौकशी संपता संपेना
Investigation of yelpane land scam did not end Ahmednagar
Investigation of yelpane land scam did not end Ahmednagarsakal
Updated on

श्रीगोंदे - तालुक्यातील येळपणेत जमीन घोटाळा झाला होता. तलाठी, मंडलाधिकाऱ्यांना हाताशी धरुन काही शेतकऱ्यांनी त्यांच्या सात बारा उताऱ्यांवर अतिरिक्त जमिन अनाधिकाराने वाढवली होती. काही ठिकाणी तर मूळ मालकांना परस्पर बाजूला सारुन सफाईदारपणे सदर जमिनीचे मालकच बदलण्यात आले होते. हा घोटाळा सकाळने सहा वर्षांपुर्वी उघड केला. प्रकरणाची चौकशी समिती नेमली. तीने अनाधिकाराने बनविलेले काही गट रद्द केले. मात्र, अजूनही ही चौकशी पुर्ण झालेली नाही.

''सकाळ''ने येळपणेतील सर्व आतल्या हाताने झालेला सौदा समोर आणल्यावर तत्कालिन प्रांताधिकाऱ्यांनी अकरा सदस्यीय चौकशी हाती घेतली. गावचे सर्वच दप्तर श्रीगोंद्यात आणले आणि चौकशी सुरु झाली.

तत्कालिन चौकशी समितीने येळपणेतील सात बारा पुस्तके, संगणकीकृत सातबारा, फेरफार, आकारबंदची तपासणी केली. येळपणेतील हस्तलिखीत सातबारा, फेरफार इत्यादी अधिकार अभिलेख तपासले. सदर सातबारा पुस्तके तयार केल्यानंतर तयार करणाराची स्वाक्षरी, त्यांची तपासणी व प्रख्यापन केल्याचे दिसून येत नाही. सातबारा पुस्तकात अनाधिकाराने पाने फाडणे, नवीन पाने जोडणे, चुकीचे फेर टाकुन संबधित नसलेल्या इसमांची नावे दाखल करणे, फेर न टाकता सातबाराच्या रकान्यात क्षेत्र बदल करणे, सिलींग जमिन वाटप नियंत्रित सत्ता प्रकार झाले.

भोगवटदार वर्ग २ चे शेरे व्हाईटनर लावून खाडाखोड करून सदर भोगवटदार वर्ग २ चा सातबारा अनाधिकाराने वर्ग १ करणे, हस्तलिखीत सातबारा व्यतिरिक्त संगणकीकृत बनावट उतारा तयार करणे, एडीट-रिएडीटच्या कामात जाणीवपूर्वक बदल करणे, गावातील आकारबंद विचारात न घेता हस्तलिखीत उताऱ्यात अनावश्यक क्षेत्रात वाढ करणे असे प्रकार अनाधिकाराने केल्याचे उघड झाले.

चौकशी समितीचा अहवाल ढोबळ आहे. त्यावरून येळपणेतील उपरोक्त नमुद गटाच्या अनुषंगाने झालेल्या प्रत्येक फेरफारामध्ये व सातबारात अनाधिकाराने नेमका कोणता बदल आहे, याबाबी स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे नव्याने काही गटांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.

३८ गटांची चौकशी सुरू

येळपणेतील जमीन घोटाळ्याची चौकशी सुरु झाल्यानंतर तेथील ३८ गटांची चौकशी सुरु झाली. आतापर्यंत त्यातील आठ गट चौकशीनंतर रद्द (बंद) करण्यात आले असून उर्वरित गटांची चौकशी सुरुच आहे. ती लवकर पुर्ण होणे आवश्यक आहे, कारण नियमीत शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.

पहिल्या टप्यात चौकशी गंभीरतेने झाली नाही. त्यातच दोन वर्षे कोरोनात गेले. यात अनेक निमयबाह्य पध्दतीने नोंदी आढळल्या असून संबधीत कर्मचाऱ्यांचे काय करायचे तो निर्णय करु. चौकशी लवकरच पुर्ण होईल.

- सुधाकर भोसले, प्रांताधिकारी श्रीगोंदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.