जामखेड : आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेवर नागपूरमध्ये पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ जामखेड आणि खर्डा येथे आज (ता. १३) कडकडीत बंद पाळण्यात आला.
पुणे ते नागपूर असा तब्बल ८०० किलोमीटरहून अधिकचा प्रवास पूर्ण करून मंगळवारी युवा संघर्ष यात्रा नागपूर शहरात दाखल झाली होती. सांगता सभेनंतर आमदार रोहित मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी विधान भवनाकडे जात असताना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिसांना वारंवार विनंती करूनही त्यांनी बळाचा वापर करत संघर्ष यात्री आणि यात्रेवर लाठी हल्ला केला. यात अनेक जण जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी जामखेड शहर आणि खर्डा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
खर्डा येथे निषेध सभेस सोसायटीचे अध्यक्ष मुकुंद गोलेकर, उपाध्यक्ष शिवाजी भोसले, माजी अध्यक्ष चंद्रकांत गोलेकर, दत्तराज पवार, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष कल्याण सुरवसे, कपिल लोंढे, महालिंग कोरे, दीपक जावळे,
विकास शिंदे, सावता लोखंडे, भीमा घोडेराव, हरिभाऊ गोलेकर, कैलास गोलेकर, विशाल साळुंखे, राजेभाऊ गोलेकर, राम शिंदे, शशिकांत गुरसाळी, दिलदार बागवान आदी उपस्थित होते.
नागपूर येथे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेला प्रस्ताव रद्द केल्याच्या निषेधार्थ उद्या (ता. १४) कर्जत शहर बंद ठेवण्यात येणार आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, देविदास खरात, प्रा. विशाल मेहत्रे, पाणीपुरवठा विभागाचे सभापती भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, नगरपंचायतीचे गटनेते संतोष मेहेत्रे, राजेंद्र पवार, भूषण ढेरे, नामदेव थोरात आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.