Jamkhed : जामखेड होणार टँकरमुक्त

१८० कोटी खर्चाच्या जामखेड शहर नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रारंभ
Jamkhed news
Jamkhed newsesakal
Updated on

जामखेड : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत १७९ कोटी ९८ लाख रुपये खर्चाच्या जामखेड शहर नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला आहे. जामखेड शहरापासून ६६ किलोमीटर अंतरावर असलेल्या उजनी जलाशयातून जामखेड शहराची महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. यामुळे जामखेड शहराला शाश्वत पिण्याचे पाणी मिळणार आहे. सध्या कार्यरत असलेली शहराची पाणीपुरवठा योजना शहरालगत असलेल्या भुतवडा लघू पाटबंधारे तलावावरून आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी (ता. ५) पुणे येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत जामखेड शहर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला.

Jamkhed news
Gardening Tips : झाडांची पाने पिवळी का पडतात? असू शकतात 'ही' कारणे

या योजनेचे काम २४ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. मे. इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड, ठाणे ही कंपनी काम करत आहे. दहिगाव ते जामखेड हे ६६.२५ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. डीआय के-९ हा ५०० एमएमचा पाईप वापरण्यात येणार आहे. सर्व पाईपलाईन भूमिगत असेल. दहिगाव, उजनी बॅक वाॅटर (ता. करमाळा) येथे पंपहाऊस असेल. ४४२ एचपीचा व्हर्टिकल टर्बाइनचे २ पंप असतील. १ पंप राखीव असेल. करमाळा रोडवर द्रोणागिरी येथे फिल्टर हाऊस असेल. तेथून शहरातील पाच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या टाक्यांमध्ये पाणी जाईल. त्या टाक्यांमधून शहरातील घराघरात पाणी पोहोचेल. जामखेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात येणारा जलशुध्दीकरण प्रकल्पाची क्षमता १ कोटी २५ लाख लिटर पाणी दिवसाला शुध्दीकरण करण्याची क्षमता आहे.

Jamkhed news
Career Tips : ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवमध्ये यश मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

पाच उंच जलकुंभ टाक्या

विकास नगर (बीड रोड) - १७.५७ लाख लिटर - शहरासह धोत्री गावास लाभ

गोल्डन सिटी (नगर रोड) - ७.९७ लाख लिटर

जमादारवाडी - ५.३६ लाख लिटर- जमादारवाडी, चुंबळी व बटेवाडी येथे पाणीपुरवठा

भुतवडा - ७६ हजार लिटर

लेहणेवाडी- २९ हजार लिटर

सदाफुले वस्ती - तीन लाख लीटर (सध्या वापरात असलेली)

Jamkhed news
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

जामखेड शहर पाणीपुरवठा योजना कामाचा कार्यारंभ आदेश देऊन, प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला आहे. पुढील ३० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून योजनेचे काम करण्यात येत आहे.

- एस. आर. वारे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगर

जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दीर्घकाळ सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यादृष्टीने कामाचे नियोजन करण्यात आले आहे.

- संजय रूमाले, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगर

जामखेड शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ झाला असून, याकरिता नगर परिषद, कार्यान्वित यंत्रणा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार याच्यचामध्ये समन्वय साधून योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

- अजय साळवे, मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()