कर्जत : कर्जत आज शिक्षणाचे केंद्र बनले आहे. कर्तृत्ववान पिढी तयार करण्याचा ध्यास कर्जतकरांनी घेतल्याने शैक्षणिक विकास झाला आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
येथे महात्मा गांधी विद्यालयाचा अमृत महोत्सवाचा प्रारंभ, दादा पाटील महाविद्यालयातील कर्मवीर जयंती सप्ताह, हीरक महोत्सव सांगता व विद्यार्थिनी वसतिगृह विस्तारित इमारत उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, मीनाताई जगधने, सचिव विकास देशमुख, डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. राजेंद्र शिवाजीराव भोर, राजेंद्र फाळके, आमदार रोहित पवार, अंबादास पिसाळ, बप्पाजी धांडे उपस्थित होते.
पवार म्हणाले की, कर्जत हे शिक्षणाचे केंद्र बनले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पाय या परिसराला लागले. व्यापकहिताचे निर्णय घेणारे लोक ओळखणे, हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कौशल्य होते. कर्मवीरांची आदर्श पायवाट स्वीकारून दादा पाटील यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन कर्जत व परिसरामध्ये शिक्षणाचे रोपटे लावले.
दादा पाटील व या परिसरातील लोक जे काम करायचे, त्याची माहिती माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचत असे. शाळा-महाविद्यालयांच्यापान नुसत्या इमारती चांगल्या असून, चालत नाहीत, तर त्या ठिकाणचा शैक्षणिक दर्जाही चांगला असायला हवा. खासदार नीलेश लंके म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमुळे बहुजनांची मुले शिकली आहेत. रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळेच आज मी खासदार आहे.
लागेल ते सहकार्य देऊ
सर्व क्षेत्रांमध्ये कर्तृत्ववान मुले-मुली घडली पाहिजेत. कर्जतच्या रयत संकुलास जे काही सहकार्य लागेल, ते ‘रयत’च्या माध्यमातून दिले जाईल, असेही खासदार पवार यांनी यावेळी आश्वासित केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.