Water Supply : तब्बल ५० दिवसांनंतर नळांना पाणी आल्याने कर्जतकरांच्या चेहऱ्यावर आनंद

अगं बाई... नगरपंचायतीच्या नळाला पाणी आले, काकू, तुमच्याकडे आले का, हे संवाद आणि संभाषण कर्जत शहरात सध्या सुरू आहेत.
Karjat Water Purification Centre
Karjat Water Purification Centresakal
Updated on

कर्जत - अगं बाई... नगरपंचायतीच्या नळाला पाणी आले, काकू, तुमच्याकडे आले का, हे संवाद आणि संभाषण कर्जत शहरात सध्या सुरू आहेत. शहरात ५० दिवसांनंतर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या नळांना पाणी आले. कर्जतकरांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहिला. दुष्काळाच्या दाहकतेत दुःखाश्रुंची जागा आनंदाश्रुने घेतली.

कर्जत नगरपंचायतीत खेड येथील भीमा नदी पाण्याच्या उद्‍भवातून पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली. खेड, राशीन आणि कर्जत, असा लांब प्रवास करून अशक्यप्राय उचल पाणी योजना तत्कालीन मंत्री आणि आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि नगराध्यक्ष नामदेव राऊत, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नांतून ते स्वप्न कृतीत उतरले.

यामुळे कायम दुष्काळी आणि टंचाईग्रस्त कर्जत शहरात महिलेच्या डोक्यावरील हंडा आणि पुरुषांच्या सायकलचा ड्रम उतरविला गेला; मात्र सात वर्षांनंतर भीमा नदीपात्र कोरडे पडले आणि पाणीपुरवठा योजना ठप्प झाली.

यंदा कमी पाऊस झाल्याने विहिरी व कूपनलिका बंद पडल्या. यानंतर पाण्यासाठी दाही दिशा असा पाणीबाणी संघर्ष सुरू झाला.

नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, पाणीपुरवठा समिती सभापती भाऊसाहेब तोरडमल, मुख्याधिकारी अजय साळवे, नगरसेवकांनी शासन दरबारी पाठपुरावा करत शहरातील २३ हजार लोकसंख्येसाठी सुमारे सात लाख लिटर मागणीनुसार १० टँकरने पाणीपुरवठा सुरू केला.

अखेर वरून राजाची कृपा झाली आणि भीमा नदी पुन्हा प्रवाहित झाली. त्यामुळे ५० दिवसांनंतर पुन्हा नळ पाणीपुरवठा योजना जिवंत झाली. पाणी पुरवठा सुरू झाला. पाणीपुरवठा योजना सुरू झाली, तरी वाड्या-वस्त्यांवर पाच खेपांसाठी टँकर सुरूच राहणार आहेत.

पाणीपुरवठा योजना बंद झाली आणि मनात धस्स झाले; मात्र शासन दरबारी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली व सर्वांच्या सहकार्यातून पाठपुरावा केला आणि टँकर सुरू केले. आमदारांनी टँकर देत मोलाची मदत केली. या परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य केले. निसर्गाच्या कृपेने पुन्हा पाणीपुरवठा योजना सुरू झाली. वेळा पत्रकाप्रमाणे नियोजन केले. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

- उषा राऊत, नगराध्यक्षा, नगरपंचायत, कर्जत

निसर्गाच्या कृपेने भीमा नदीपात्रात आलेल्या पाण्यामुळे कर्जत शहराला होणारा पाणीपुरवठा आजपासून दोन दिवसांआड प्रत्येक भागाला केला जाईल. टंचाई काळात शासकीय टँकर व आमदार रोहित पवारांमार्फत पाणी टँकरमुळे मोठी मदत झाली.

- भाऊसाहेब तोरडमल, सभापती, पाणीपुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.