Karjat Crime: माजी नगराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा, बेकायदेशीर बिलं काढण्यासाठी महिला अधिकाऱ्याला केला अश्लील शिवीगाळ

कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या विरोधात कर्जत पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
Karjat Crime: माजी नगराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा, बेकायदेशीर बिलं काढण्यासाठी महिला अधिकाऱ्याला केला अश्लील शिवीगाळ
Updated on

Karjat Politician abused woman Officer : कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या विरोधात कर्जत पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

जीवे मारण्याची धमकी, अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याची कलमे लावण्यात आली आहेत. राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली.

कर्जत येथील एका शासकीय कार्यालयात जाऊन राऊत यांनी महिला अधिकाऱ्याला ''कायदेशीर बेकादेशीर काही संबंध नाही, मी सांगेल तीच पूर्व दिशा'', अशा शब्दांमध्ये दम दिला. त्यावर ''बेकायदेशीर कुठलीही बिले काढली जाणार नाहीत'', असे महिला अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर राग आल्याने राऊत यांनी अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Latest Marathi News)

तसेच कोणाला फोन करू नये म्हणून राऊत यांनी महिला अधिकाऱ्याचा फोन हिसकावून घेतला व जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार झाल्यानंतर राऊत कार्यालयातून निघून गेले. जीवे मारण्याची धमकी, अश्लील शिवीगाळ, मारहाण व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे करीत आहेत.

Karjat Crime: माजी नगराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा, बेकायदेशीर बिलं काढण्यासाठी महिला अधिकाऱ्याला केला अश्लील शिवीगाळ
Chhagan Bhujbal : ''भुजबळांना भाजप ओबीसींचा देशव्यापी चेहरा बनवणार'', दमानियांचा नवीन गौप्यस्फोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.