Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील एमआयडीसी रद्द! पाटेगावकरांचा विरोध, जागा शोधण्याचा आदेश

कर्जत तालुक्यात एमआयडीसी करण्यासाठी येत्या १५ दिवसांत नवीन जागा शोधण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले.
karjat midc cancelled uday samant pategaon gram panchayat oppose land searching order
karjat midc cancelled uday samant pategaon gram panchayat oppose land searching orderSakal
Updated on

कर्जत-जामखेड : कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील प्रस्तावित एमआयडीसीची जमीन देश सोडून पळून गेलेला नीरव मोदी याची असल्याने आणि पाटेगाव ग्रामपंचायतीने विरोध केल्याने, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रद्द केली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात एमआयडीसी करण्यासाठी येत्या १५ दिवसांत नवीन जागा शोधण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले.

कर्जत तालुक्यातील नियोजित पाटेगाव एमआयडीसीबाबत नागपूर येथे आज उद्योगमंत्री सामंत यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रस्तावित पाटेगाव एमआयडीसीबाबत चर्चा झाली.

एमआयडीसीला पाटेगाव ग्रामपंचायतीने विरोध केला असतानाच, तेथील जमीन देशातून पळून गेलेला नीरव मोदी याची असल्यामुळे मंत्री सावंत यांनी एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द केला. मात्र कर्जत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे,

यासाठी उद्योगधंदे आले पाहिजेत, त्यादृष्टिकोनातून त्यांनी अन्य ठिकाणी जमीन शोधून परिपूर्ण प्रस्ताव १५ दिवसांच्या आत तयार करून शासनाला सादर करावा, असे आदेश संबंधितांना दिले.

karjat midc cancelled uday samant pategaon gram panchayat oppose land searching order
Ahmednagar: परप्रांतीयाचा खून करणाऱ्यांना ४८ तासांत ठोकल्या बेड्या; धक्कादायक कारण आलं समोर, MIDC पोलिसांची कामगिरी

या बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग विभागाचे सहसचिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक (भूमी), नाशिकचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते.

सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्यासाठी एमआयडीसी गरजेची आहे. याकामी नवीन जागेचा शोध घेऊन, येत्या १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सावंत यांनी दिले आहेत.

- राम शिंदे, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()