वेशांतर करून मंदिरात राहणारा खुनी गजाआड | Ahmednagar

police Arrest
police Arrestesakal
Updated on

राहुरी (जि. अहमदनगर) : शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेला मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय ४६, रा. वांबोरी) याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. २८ ऑगस्ट २०२१ पासून आरोपी मोरे पसार होता.

गुहा फाटा (ता. राहुरी) येथे एका मंदिरात आरोपी मोरे वेशांतर करून राहात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. पोलिस पथकाने तेथील मंदिराला सापळा लावून माेरे याला ताब्यात घेतले. त्याला ताेफखाना पाेलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

police Arrest
विश्वास संपादन केला अन् कांदा व्यापाऱ्याला घातला 34 लाखांचा गंडा

लघुशंकेच्या बहाण्याने सिनेस्टाईल पलायन

राहुरी येथे ६ एप्रिल २०२१ रोजी पत्रकार दातीर यांचे अपहरण करून, जबरी मारहाण करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य आरोपी मोरे घटनेनंतर बाराव्या दिवशी १८ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असताना आरोपी मोरे याला कोरोनाची बाधा झाली. त्याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्याला मूतखड्याचा त्रास सुरु झाला. त्याला पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात येणार होते. त्याला ॲम्बुलन्समध्ये बसण्यास सांगण्यात आले.‌ तेवढ्यात ॲम्बुलन्स चालकाला हृदयविकाराचा झटका आला. या गोंधळात लघुशंकेच्या बहाण्याने आरोपी मोरे याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले.

याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस नाईक भगवान किसन पालवे व गणपत जयवंत झरेकर यांना निलंबित करण्यात आले होते.‌‌ पोलिस आरोपी मोरे याचा कसून शोध घेत होते. सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक सोपान गोरे यांचे पथक शोध घेतांना आरोपी माेरे मध्यप्रदेशातील बडवा जिल्ह्यात राहात असल्याची माहिती मिळाली. परंतु, ताे तेथून पसार झाला. त्याला मदत करणारे त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरु मरकड (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) व सतीश श्रीकांत हरिश्चंद्रे (रा. धामोरी खुर्द, ता. राहुरी) या दाेघांनाही ताेफखाना पाेलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.

police Arrest
दंड भरण्यास सांगितल्याच्या रागातून महिला पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ

दरम्यान, राहुरीत तालुक्यात गुहा फाट्याजवळ मळगंगा मंदिरात आरोपी माेरे वेशांतर करून राहत असल्याची माहिती निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. पोलिस पथकाने तेथील मंदिराभोवती सापळा लावून माेरे याला ताब्यात घेतले. त्याला, ताेफखाना पाेलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.