Kopargaon crime : गोळीबाराची चौकशी होणार...उपअधीक्षकांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

Kopargaon crime : कोपरगावच्या नागरिकांनी अवैध व्यवसायांना बंदी आणण्यासाठी गोळीबाराच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. उपोषणानंतर पोलिस उपअधीक्षकांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले.
Kopargaon crime
Kopargaon crimesakal
Updated on

कोपरगाव : शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद व्हावे, तसेच १९ सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या गोळीबारातील जखमी इसमाने अनेकांची नावे घेतली. त्यात आमदारांचे स्वीय सहायक यांचे नाव घेतले होते. त्याबद्दल सखोल चौकशी व्हावी यासाठी कोल्हे गटाचे दत्ता काले, विजय आढाव, बबलू वाणी, विनोद राक्षे, संदीप देवकर यांनी सुरू केलेले उपोषण सुरू केले होते. पोलिस उपअधीक्षक यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण सुटले आहे.

पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने, युवानेते विवेक कोल्हे, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी दिलेल्या निवेदनातील मागणीनुसार झालेल्या आरोपांची सखोल चौकशी व अवैध धंदे बंद होण्यासाठी कार्यवाही करू, असे सूचित केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर अन्नत्याग करत उपोषण सुरू करण्यात आले होते. अनेक अवैध व्यवसाय शहरात वाढले आहे. व्यसनाधिनतेतून गुन्हेगारी फोफावली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे दहशतीचे वातावरण असल्याच्या नागरिकांमधून भावना व्यक्त झाल्या. शहराच्या बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत आहे.

सोने चोरीसारखे अनेक गुन्हे अलीकडच्या काळात घडले व पुरावे असून त्याचा छडा अद्याप लागला नाही. वेळीच वाढती गुन्हेगारी रोखली जावी. आपल्या शहराचे आणि तालुक्याची ही संस्कृती नाही. मात्र, राजकीय आश्रयामुळे असे प्रकार दिवसेंदिवस वाढीस लागले आहेत. गोळीबार प्रकरणातील जखमी व्यक्तीने आरोप केलेल्या व्हिडिओतील नावांची चौकशी होऊन त्यांचे फोन कॉल डिटेल्स सीडीआर तपासून चौकशी होण्याची जी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. त्याची पोलिस प्रशासनाने दखल घ्यावी. पोलिसांनी कुठल्याही दबावात न येता नि:पक्षपणे या घटनेचा सखोल तपास करावा, असेही कोल्हे म्हणाले.

या आंदोलनास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरपीआय व मित्र पक्ष, राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, ज्येष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब, सुधीर डागा व्यापारी महासंघ यांच्या वतीने या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यात आला. आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.