Lahu Kanade:'श्रीरामपूर पालिका तलावात पाणी सोडा' !आमदार लहू कानडे यांची पालकमंत्री विखे यांच्याकडे मागणी

Bhandardara Dam Water Sharing: भंडारदरा धरणातून श्रीरामपुरसाठी आवर्तन सोडण्यात यावं, अशी मागणी लहू कानडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना केली.
Lahu Kanade:'श्रीरामपूर पालिका तलावात पाणी सोडा' !आमदार लहू कानडे यांची पालकमंत्री विखे यांच्याकडे मागणी
Updated on

Lahu Kanade on Shrirampur Lake :भंडारदरा धरणाच्या आवर्तनातून श्रीरामपूर व बेलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

श्रीरामपूर नगरपरिषदेअंतर्गत जवळपास एक लाख, तसेच बेलापूरची ४० हजार लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्हीही पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावातील पाणी संपले आहे. नगरपरिषद व बेलापूर ग्रामपंचायतीने साठवण तलावात पाणी सोडणेबाबत जलसंपदा विभागाकडे मागणी नोंदविलेली आहे.

सध्या दिवाळीचा सण तोंडावर आला असून, या काळात पिण्याचे पाणी मिळाले नाही, तर या दोन्ही गावांना भीषण पाणीटंचाई जानवणार आहे. त्यामुळे अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दोन्ही साठवण तलावात तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी कानडे यांनी पत्राद्वारे केली आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही लेखी पत्र पाठवून सूचना करण्यात आल्या असल्याचे कानडे यांनी सांगितले.(Latest Marathi News)

माजी नगराध्यक्षा आदिकांचीही मागणी

दिवाळी सण जवळ आला असताना पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करण्याची वेळ श्रीरामपूरकरांवर येऊन ठेपली आहे. यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरावे, अशी मागणी कार्यकारी अभियंत्याकडे भेट घेऊन माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Lahu Kanade:'श्रीरामपूर पालिका तलावात पाणी सोडा' !आमदार लहू कानडे यांची पालकमंत्री विखे यांच्याकडे मागणी
Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानी धमकी प्रकरणात आणखी एकाला अटक; तेलंगणानंतर गुजरातमध्ये कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.