अनधिकृत रोपवाटिकांचे फुटले पेव, शेतकऱ्यांची होते फसवणूक

nurseries
nurseries
Updated on

कर्जत : तालुक्यात अवघ्या तीनच शासकीय अधिकृत परवाना प्राप्त रोपवाटिका असून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रोपवाटिकांचे पेव फुटले आहेत. जूनमध्ये लागवडीच्या हंगामात शासनाचा परवाना न घेता विविध फळझाडांच्या रोपांची विक्री होत आहे. रोपांच्या वाणांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे. दरवर्षी यातून तालुक्यात कोट्यावधींची उलाढाल झाली. मात्र, या रोपवाटिकांमधून दर्जेदार वाणांची नावे सांगून वाढीव दराने विक्री होत आहे.

पालेभाज्या तसेच फळबागा पिकवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रोपवाटिकांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून परवानगी दिली जाते. यामध्ये रोपवाटिका चालकांना विविध निर्बंध घातले. रोपांची जोपासना करण्यासाठी मातृवृक्ष हे कृषी विद्यापीठ, शासकीय रोपवाटिका येथून खरेदी केलेले असावे लागतात. मात्र, मातृवृक्षाबाबत कसलीच माहिती न देता या रोपवाटिका चालकांकडून रोपे विकली जातात. (Large number of unauthorized nurseries in Karjat taluka)

nurseries
सदाभाऊ खोत अण्णांच्या भेटीला, सरकारलाच कोरोना झाल्याची टीका

कृषी विभागाकडून या रोपवाटिकांवर नियंत्रण ठेवले जाते. मात्र, तालुक्यात अनधिकृत रोपवाटिका सुरू असताना कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी गप्प का आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत कृषी मंत्र्यांना लवकरच शेतकरी प्रतिनिधी शिष्टमंडळाने भेटून त्यांच्यापुढे ही कैफियत मांडणार आहेत. तालुक्यात रेहेकुरी, पठारवाडी आणि बहिरोबावाडीत अधिकृत रोपवाटिका असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी दिली.

तालुक्यातील रोपवाटिकेतून परवाना नसताना फळ रोपांची विक्री होत आहे. रोपांची खरेदी केल्यानंतर मागणी करूनही बिल मिळत नाही. मातृवृक्ष व वाणांबाबत माहिती न देता विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते.

- आबासाहेब कदम, माहिजळगाव

अनधिकृत रोपवाटिकांची माहिती घेवून कारवाई करण्यासंदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहेत. याबाबत त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई होईल. फसवणूक झाल्याबाबत तक्रारी असतील तर त्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे कराव्यात, त्याची योग्य दखल घेतली जाईल

- प्रवीणकुमार गवांदे, उपविभागीय कृषी अधिकारी, कर्जत

(Large number of unauthorized nurseries in Karjat taluka)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()