Ahmednagar Politics : निवडणूक आयोगाकडून यंत्रांची तपासणी; ६० कर्मचारी तैनात

६० कर्मचारी रोज या यंत्रांची तपासणी; एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही यंत्रे ठेवली आहेत
lok sabha election ahmednagar politics election commision check evm machine 60 employee
lok sabha election ahmednagar politics election commision check evm machine 60 employee esakal
Updated on

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात व्ही. व्ही. पॅट यंत्रे दाखल झाली आहेत. त्यांची प्राथमिक तपासणी जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही यंत्रे ठेवली आहेत.

बॅलेट युनिट ९ हजार ९४९, कंट्रोल युनिट ५ हजार ५९७, व्ही.व्ही. पॅट यंत्रे ६ हजार ८९ आहेत. त्यांची प्राथमिक तपासणी सुरू आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्‍स कंपनी, बंगळुरूचे १० अभियंते आले आहेत. निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसीलदार गोसावी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य विभागांतील एक उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या देखरेखीखाली ६० कर्मचारी रोज या यंत्रांची तपासणी करत आहेत. त्यासाठी आठ टेबल आहेत.

lok sabha election ahmednagar politics election commision check evm machine 60 employee
Ahmednagar School News : १६१ शाळांवर टांगती तलवार, पटसंख्येचा प्रश्‍न; शिक्षक भारतीची आक्रमक भूमिका

प्रत्येक अभियंत्यावर एका टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार, असे सहा दिवस तपासणीचे होत आहे. येत्या १० ऑगस्टपर्यंत हे काम चालेल. वखार महामंडळाच्या गोडाऊनच्या सुरक्षेसाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.