टाकळी ढोकेश्वर (जि. नगर) : जिह्यातील पारनेर तालुक्यासह सर्वच लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा, नोंदणीचा गोंधळ ठरलेला आहे. याबाबत ठोस धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे. मात्र, यावर कोणीही राजकीय नेते किंवा सरकारी अधिकारी बोलताना दिसत नाही. (Long queues at the Corona Vaccination Center in the ahmednagar district)
सरकारी रूग्णालयावर ही लस मोफत दिली जात आहे. खासगी रूग्णालयात मात्र, याचे भाव सामन्यांना न परवडणारे आहेत. कोविडशीड ७८०, कोवॅक्सीन १४१० रूपयांना विकत घ्यावी लागत आहे. नागरिक ऑनलाईन नोंदणीकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागते. ऑनलाईन नोंदणी न केल्याने नागरिक पहाटेपासुनच रूग्णालयात रांगा लावत आहेत. त्यानंतरही नाव नोंदणी, टोकण त्यानंतर काही केंद्रावर रॅपिड टेस्ट करावी लागत आहे. या सर्व प्रक्रियेत नागरिकांचा पूर्ण दिवस जात आहे. मात्र, जे नागरिक आजही ऑनलाईन नोंदणी करत आहेत त्यांना या त्रासातून जावे लागत नाही.
ग्रामीण भागात ऑनलाईनचा पर्याय नागरिक वापरत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांनाही नोंदणी करताना अडचणी येतात. ऑनलाईनच पर्याय ठेवला तर हा गोंधळ होणार नाही आजही राजकीय नेते किंवा अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. डोसांची संख्या येते कमी प्रमाणात आणि नागरिकांची रुग्णालयासमोर लांबच लांब रांग. लसीकरण तर वेगाने झाले तर कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे, संशोधनातुन ते समोर येत आहे. मात्र, या यंत्रणेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पारनेर तालुक्यात लसीकरण ७२,७७५ झाले आहे. त्यापैकी पहीला ढोस ५२२२८, दुसरा ढोस २०५४७ नागरिकांना झाला आहे. ही २३ जुलै पर्यंतची आकडेवाडी आहे.
वाढीव लसीकरणाबाबत मागणी करणार : शेळके
पारनेर तालुक्यातील कोरोना बाधित रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. लसीकरणाचा वेगही कमी आहे. याबाबत ठोस धोरण ठरविणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या सर्व बाबींची त्यांना माहीती देणार आहे व पारनेर तालुक्यासाठी वाढीव लसीकरण ढोसांची मागणी करणार आहे.
ऑनलाईन नोंदणीची पद्धत
cowin.jov.in या वेबसाईटवर जावे मोबाईल नंबर टाईप करावा मोबाईलवर ओटीपी येईल तो वेबसाईटवर टाकल्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडुन जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या लसीकरण केंद्रावर लसीच्या ढोसाची नोंदणी करून त्या विहीत तारखेला व वेळेला लस घेता येईल.
गुजरात सारख्या राज्यात सरकारी दवाखान्यात कोरोना लसीची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. तथापी, तेथे खासगीत हे प्रमाण नगण्य आहे. महाराष्ट्रामध्ये हेच दृश्य उलट प्रमाणात दिसते. खासगी रूग्णालयात लस मुबलक आहे तर सरकारी दवाखान्यात अल्प प्रमाण आहे. ही माहिती वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वांना दिसते. केंद्र महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक देत आहे का? - कैलास लोंढे, संगणक तंत्रसेन्ही
(Long queues at the Corona Vaccination Center in the ahmednagar district)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.