आधुनिकीकरणाच्या युगात बैलांचे गोठे ओस! सणाची परंपरा मात्र कायम

Bailpola
Bailpola esakal
Updated on

नेवासे (जि. नाशिक) : बैलांवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून पोळा या सणाचे महत्त्व आहे. या दिवशी बळीराजा आपल्या 'सर्जा-राजा'ची यथोचित पूजा करून कृतज्ञ होण्याचा प्रयत्न करतो; मात्र आताच्या आधुनिक युगात बैलांचे महत्त्व व उपयोगिता कमी होत चालली आहे. परंपरा कायम असली, तरी वास्तवात बळीराजाचे वैभव असलेले गोठे ओस पडू लागले आहे.

बैल हा शेतीव्यवस्थेचा कणा आहे. त्याला पोळ्याच्या दिवशी सजविले जाते. सर्जा-राजाच्या जोडीला बळीराजाची घरच्या लक्ष्मीकडून पूजा होते. शेतीच्या मशागतीसाठी जुंपलेली बैलजोडी व त्यांच्यासोबत कष्ट करणारा बळीराजा या सवंगड्यांचं जिवा-भावाचं नातं असतं.

विभक्त कुटुंबपद्धतीमुळे पशुधन पाळणे अवघड

वाढते शहरीकरण व विभक्त कुटुंब पद्धतीसह आधुनिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत चालली आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे शेतीचे तुकडे झाल्याने शेतकरी अल्पभूधारक होत आहेत. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नात होऊन पशुधन पाळणे अवघड होत आहे. घटलेले शेती क्षेत्र, चाऱ्याचा भेडसावणारा प्रश्न, खाद्याचे वाढणारे दर यामुळेही बैल सांभाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आधुनिकीकरणाच्या युगात कृषिक्षेत्रातही मोठे बदल घडू लागले आहेत. शेतजमिनीवर बैलांचे पाण्याचा मान असायचा, तो काळ मागे पडला. आता तर शेतीच्या कामात नांगरण, वखरण, पेरणी, फवारणी अशी सर्वच कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत. कृषिकामात यांत्रिकीकरण आल्याने पारंपरिक औजारांची जागा यंत्राने घेतली. बैलजोडीद्वारे दिवसभर चालणारी कामे काही तासांतच होऊ लागली.

Bailpola
5 एकर डाळिंबाचे झाले चक्क 65 लाख! शेतकरी तरुणाची कथा

शेती मशागतीसाठी वाढला ट्रॅक्टरचा वापर

यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे सोपी होऊन वेळ व श्रमही कमी झाले. त्यामुळे शेतकरी बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य देत आहेत. या ट्रॅक्टरने इतरांची कामे केल्यास आर्थिक उत्पन्नातही भर पडते. त्यामुळेच ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात आहे. काही मंडळी ही उदरनिर्वाहासाठी बैलजोडीचा उपयोग म्हणून बैलांना सांभाळत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांची वाढत चाललेली संख्या, मशागतीसाठी यंत्राचा वापर, चारा उपलब्धतेत होणारी घट व बैलांचे संगोपन करणे अवघड बनत असल्याने शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे सोपी होऊन वेळ व श्रमही कमी झाले. त्यामुळे शेतकरी बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य देत आहेत. या ट्रॅक्टरने इतरांची कामे केल्यास आर्थिक उत्पन्नातही भर पडते. त्यामुळेच ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात आहे. चारा उपलब्धतेत होणारी घट व बैलांचे संगोपन करणे अवघड बनत असल्याने शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे सोपी होऊन वेळ व श्रमही कमी झाले. त्यामुळे शेतकरी बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य देत आहेत. या ट्रॅक्टरने इतरांची कामे केल्यास आर्थिक उत्पन्नातही भर पडते. त्यामुळेच ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात आहे. चारा उपलब्धतेत होणारी घट व बैलांचे संगोपन करणे अवघड बनत असल्याने शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. esakal

पूजेसाठी मातीचे बैल

हल्ली बहुतांशी शेतकऱ्यांकडे शेतीच्या मशागतीला यंत्राचा वापर होत असल्याने बैलांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या युगात बैलांच्या कमी संख्येमुळे अनेकांवर मातीच्या बैलांची पूजा करण्याची वेळ आली आहे.

Bailpola
जामखेड : होगनास कंपनीकडून आरोग्य केंद्रास ऑक्सिजन प्लँटची देणगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.